ग्रीन फोरमच्या वृक्ष लागवडीने कोपरगावमध्ये दरवळला सप्तपर्णीचा सुगंध

वृक्षांमुळे कोपरगावकरांची दिवाळी झाली सुगंधी 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : दिवाळीच्या उत्सवाची लगबग सुरु झाली नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली.  मोठमोठी दुकाने, कार्यालये बॅंका पतसंस्था, बंगले, बहुमजली इमारती आणि सर्वसामान्य नागरीकांची घरे आकर्षक विद्युत रोषणाई सेली, रंगीबेरंगी आकाशीदिवे लावल्याने कोपरगाव शहराची रोषणाई अधिक खुलुन दिसत असताना संपूर्ण शहराच्या मुख्य रस्त्यावरू जाताना सर्वञ  मंद सुगंध दरवळत असल्याने  कोपरगाव शहरातील वातावरण अतिशय प्रफुल्लित व सुखदायक झाले आहे.

शहराच्या रस्त्यालगत ग्रीन कोपरगाव फोरमच्या माध्यमातून लावलेल्या सप्तपर्णी वृक्षाला सध्या सुगंधी फुलांचा बहर आला आहे. सप्तपर्णी फुलांचा सुगंध शहराच्या अनेक रस्त्यांवर दरवळत असल्याने शहरातील वातावरण सायंकाळच्या दरम्यान अधिक सुगंधी होत असल्याने नागरीकांना सुखदायक वाटु वागले आहे.

  दिवाळीच्या सणाला नागरीक सुगंधी उटण्याने अंघोळ करुन आपलं शरीर सुगंधी करण्याचा प्रयत्न करता. माञ कोपरगाव शहरातील अनेक वृक्षांनी आपल्या नैसर्गिक रुपातुन अर्थात फुलांच्या माध्यमातून सुगंध देण्याचे कार्य करतात. सप्तपर्णी वृक्षाच्या फुलांनी कोपरगाव शहर सुगंधी झाले. 

 मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शहरातील सर्व वृक्षांच्या बुंध्याला आकर्षक रंगरंगोटी केल्याने शहरातील वातावरण अधिक खुलले आहे. 

 दरम्यान ग्रीन कोपरगाव फोरमच्या माध्यमातून सन २०१६ साली तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या सहकार्यातून ग्रीन फोरमचे वनस्पती तज्ञ कांतीलाल वक्ते, शेखर भोंगळे, विजय शेटे, राजेश ठोळे, सत्येन मुंदडा, अमित जैन, शार्दुल आभाळे, वासुदेव साळुंखे यांच्यासह जवळपास १२५ सभासदांनी एकञ मिळून वर्गणी करुन कोपरगाव शहरात तब्बल दिड हजार विविध वृक्षांची लागवड केली.  ठराविक ९०० वृक्ष आंध्रप्रदेश येथून आणण्यात आले त्यात सुंगधी आयुर्वेदिक महत्व असलेले सप्तपर्णी, सोनमोहर, रेन ट्री, कांचन, क्रीसम ट्री आदी वृक्षांची लागवड करुन कोपरगाव शहरात वृक्ष लागवडीचा नवा विक्रम केला.

ग्रीन फोरम संघटच्या सभासदांनी केवळ फोटो काढण्यासाठी वृक्षांची लागवड केली नाही तर प्रत्येकांनी लावलेल्या रोपट्यांची लहान मुलासमान जपणुक केली. तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी शहराच्या अनेक भागात वृक्ष लागवडीला बळ देवून त्यांना नियमीत पाणी घालण्याचे काम केल्यामुळे रोपट्यांचे रुपांतर मोठ्या वृक्षात होत गले. देरेकर यांच्यानंतर आलेले मुख्याधिकारी सरोदे यांनी पाणी घालण्यात सातत्य ठेवले आणि आज कोपरगाव शहरातील बहुतांश रस्ते हिरवळीने फुलले. कोपरगाव ग्रीन आणि  क्लिन करण्यासाठी समता पतसंस्थेचे काका कोयटे, ज्योती पतसंस्थेचे रविंद्र बोरावके यांनी  शहराच्या सुशोभीकरण करण्यात भाग घेवून शहरातील हिरवळ वाढवली. युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपल्या माध्यमातून शहराच्या रस्त्यांना हिरवळ वाढवून नवा आकार दिला. आमदार आशुतोष काळे यांनी अनेक ठिकाणी मदत केली. 

धुळगाव म्हणुन ओळख निर्माण झालेल्या कोपरगाव शहराची ग्रीन  कोपरगाव अशी  नवी ओळख ग्रीन फोरमच्या सभासदांनी केली. आज वाढवलेल्या वृक्षामध्ये सप्तपर्णी वृक्षाने या वर्षाची दिवाळी सुगंधी केली. संपुर्ण शहरात सप्तपर्णी वृक्षांच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना  पुर्वी दुर्गंधीचा सामना करावा लाग होता पण आता सर्वञ सुंगध दरवळत असल्याने कोपरगाव शहराचे संपूर्ण वातवरण प्रफुल्लित झाले आहे.

ढेरेदार वृक्ष शहराच्या अनेक रस्त्यावर लावल्याने  बाहेरगावाहून आलेले छोटे व्यापारी, शेछमाल विकणारे शेतकरी यांना माल विक्रीसाठी आसरा झाला आहे. उन्हाळ्यात दाट सावली पडत असल्याने अनेकजन ग्रीन फोरमने लावलेल्या वृक्षाखाली विसावत आहेत.

 शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या सप्तपर्णी वृक्षाने हि दिवाळी सुगंधी केली आहे. संपुर्ण कोपरगाव शहराला सुगंधी उटणे लावल्याचा भास होतोय.  शहरात विविध प्रकारचे दिड हजार वृक्ष लागवड केल्याने प्रत्येक ऋतुत वेगवेगळ्या झाडांना फुले लागतात त्यामुळे कोपरगाव शहरातील वातवरण कायम फुलत राहणार आहे. अशी प्रतिक्रिया वनस्पती तज्ञ डॉ.कांतीलाल वक्ते यांनी दिली.