शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालयात भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अर्थसहाय्याने इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आदिवासी जीवन, साहित्य, संस्कृती आणि ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रास देशभरातून ४० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.

अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य, सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चर्चा सत्राचे उद्घाटन तामिळनाडू येथील अण्णा विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. जे. जयचंद्रन
यांच्या ह्स्ते झाले.

यावेळी प्रो. जयचंद्रन यांनी,सध्या आदिवासीची परंपरा, संस्कृती व साहित्य यांचे जतन करणे गरजेचे असल्याचे नमुद केले. तर चर्चासत्राचे बीज भाषक संगमनेर महाविद्यालयाच्या इंग्रजी संशोधन केंद्राचे संचालक प्रो. डॉ. उमेश जगदाळे यांनी महाराष्ट्रातील आदिवासीची कला, संस्कृती व साहित्य विशेषतः कवितेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील कवींनी केलेले समाज चित्रण यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. सागडे यांनी महाराष्ट्रातील आदिवासी जमाती व त्यांचे जीवन यासंबधी मार्गदर्शनपर केले.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागत केले. यावेळी कन्नूर विद्यापीठाच्या डॉ. श्रीबिया व्ही.पी., विमला महाविद्यालय (स्वायत्त) थ्रिसुर, केरळ येथील डॉ. जीभी भास्करन, आदिवासी कवी वहारू सोनवने तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ युवराज सुडके सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. राहुल ताके यांनी सूत्रसंचालन केले तरप्रा. अनिल काळे यांनी आभार मानले.
