कामाच्या गुणवत्तेशी तडजोड होणार नाही – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : रस्ता वीज पाणी ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना मध्यंतरीचा काही कालावधी सोडता शासनाकडून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कामांसाठी मोठा निधी आणता आला. केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशनचे कम तसेच पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. मतदारसंघातील दोनही नगरपरिषदांना लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणी मिळणार आहे.

मतदारसंघातील बहुतांशी मुख्य रस्त्यांची कामे झाली असून, काही प्रगतीपथावर आहेत. तसेच ग्रामीण भागातील प्लॅनवरील व नॉन प्लॅन रस्त्यांसाठीही मोठा निधी उपलब्ध केला आहे. मतांच्या बेरीज वजाबाकीचा विचार न करता नागरिकांच्या अडचणींचे निवारण करणे हेच ध्येय ठेवून आपण काम करत आहोत. कामे करताना कार्यान्वित यंत्रणा व ठेकेदार यांचे कडून कामाची गुणवत्ता राखणे अपेक्षित आहे. कामाची गुणवत्ता न देणाऱ्या कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याची ग्वाही आ. मोनिका राजळे यांनी दिली. शेवगाव येथील लांडे वस्ती – बडे वस्ती या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

शेवगाव नगरपरिषद हद्दीतील लांडे वस्ती – बडे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण, वरुड चौक ते भाडाईत गल्ली रस्ता काँक्रिटीकरण, आखेगाव रोड ते कोरडे वस्ती – डोईफोडे वस्ती रस्ता डांबरीकरण, प्रभाग एक अंतर्गतील देवराव सांगळे निवास ते वाघमारे निवास रस्ता मजबुतीकरण, श्रीराम कॉलनी अंतर्गतील सईदा शेख घर ते नितीन जाधव घर आरसीसी गटार, भगवान बाबा मंदिर परिसर पेविंग ब्लॉक, अंबिका कॉलनी नगर रोड ते ढाकणे घर पेविंग ब्लॉक, आखेगाव रोड ते जायभाय घर रस्ता काँक्रिटीकरण,

भेंडा ऑफिस ते बैरागी वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, मिरी रोड ते सोलाट घर रस्ता काँक्रिटीकरण, सिध्दीविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण, खंडोबा नगर येथे भिसे निवास ते पंचायत समिती रोड आरसीसी गटार, दादेगाव रोड ते आधार चारी रोड खडीकरण, हॉटेल निसर्ग रस्ता मजबुतीकरण, पाथर्डी रोड ते गाडेकर घर रस्ता मजबुतीकरण करणे आदि २ कोटी ९५ लाख रु खर्चाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राम लांडे म्हणाले, राजकिय पुढारी आश्वासने देऊन मते मागतात, मात्र मोनिका यांच्या माध्यमातुन पहिल्या आमदार पाहिल्या कि, ज्या आगोदर काम घेऊन आल्या आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत मत मागण्याासाठी येतील. शहरालगत आमची मोठी वस्ती असतांना विकास कामांसाठी कायमच दुर्लक्षित राहिली, आता आमदारांच्या माध्यमातुन मोठा निधी उपलब्ध झाला असुन उर्वरित कामही त्यांच्या माध्यमातुन पुर्ण होईल .

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे,  भाजपाचे जेष्ठ नेते सुनील रासने, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, अशोक आहूजा, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, कचरू चोथे, किरण पवार, बाप्पू धनवडे, लांडे वस्ती येथील भूषण देशमुख, उमेश लांडे,

वसंतराव लांडे गुरुजी, तात्या लांडे, सतीश लांडे, राजू परदेशी, विजयराव देशमुख, शिवसिंग परदेशी, रामकिसन कराड, अमोल लांडे, गोविंद लांडे, भगवान लांडे, दीपक लांडे, आदित्य लांडे, साईनाथ जाधव, अरुण लांडे, राहुल लांडे, अक्षय लांडे आदी उपस्थित होते. डॉ. निरज लांडे यांनी सुत्रसंचलन केले, राम लांडे यांनी आभार मानले. 

ReplyReply allForward