कॉ.सुभाष लांडे पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून देतील – कॉ.राम बाहेती

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : कॉ. सुभाष पाटील लांडे हे विद्यार्थीदशेपासून डाव्या चळवळीशी निगडीत असून समजातील शेतकरी, कष्टकरी, आशाताई, अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी अशा विविध घटकातील कष्टकर्यांलवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून शासनच्या व प्रशासनाच्या विरोधात वेळीवेळी संघर्षाची भूमिका घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कॉ.लांडे आणि कॉं. संजय नांगरे यांनी केले आहे.

अन्यायाच्या विरोधात निघालेल्या मोर्चात आपल्या मागे किती लोक आहेत. याचा विचार न करता रस्त्यात जे भेटतील त्यांना बरोबर घेवून, वंचिताना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव म्हणून राज्य भर काम करण्याची संधी लांडे यांना मिळाली असून आपल्या कार्यातून ते पक्षालाही नवसंजीवनी प्राप्त करून देतील असा आत्मविश्वास जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.राम बाहेती यांनी व्यक्त केला.

       कॉ.सुभाष लांडे यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव पदी तर कॉ.संजय नांगरे यांची राज्य कौन्सिलच्या सदस्य पदी निवड झाल्याने त्यांचा आज रविवारी ( दि९ ) नागरी सत्कार त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

     कॉ. बाहेती यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२५ मध्ये कानपूरला झाली. त्याच वेळेस आणि त्याच वेळी जाती आणि धर्माच्या नावानं राजकारण  करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरात झाली. त्यांचे  मुसलमान, दलित आणि कम्युनिस्ट हे तीन प्रमुख शत्रू आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष  जगभर पसरलेला एकमेव पक्ष आहे.  दहा-बारा देशांत पक्षाचे पंतप्रधान आहेत. बंगालमध्ये त्रिपुरामध्ये अनेक वर्ष सत्तेत आहेत. हे जाती आणि धर्माच्या नावानं राजकारण करणाऱ्याला सहन झालं नाही आणि मग त्यांनी जनतेत वेगवेगळी विष पेरण्या सुरुवात केली. 

भगवा हा कोणाला ठेका म्हणून दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, गौतम बुद्धांचा, संत तुकारामांचा, वारकऱ्यांचा हा भगवा आहे म्हणून त्या भगव्याचे खऱ्या अर्थानं संरक्षण कोण करणार असेल तर भगव्याच्या नावाने राजकारण करणारे नाही, तर त्या भगव्याचे संरक्षण केवळ आणि केवळ लाल झेंडा करणार आहे. हा आमचा संतांचा महंताचा, बुद्धांचा भगवा आहे. रेशीम धाग्याचा ‘भगवा नागपुरात तयार झालेला माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणारा आहे, अशी टीका केली.

यावेळी  ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष  कॉ.नामदेवराव चव्हाण, कॉ.बन्सी सातपुते, कॉ.कृष्णनाथ पवार, कॉ.बाबा आरगडे, कॉ.शशिकांत कुलकर्णी,  प्राचार्य शिवाजीराव देवढे, किसनराव माने, कॉ.स्मिता पानसरे, कॉ.बेबी नंदा लांडे, कॉ.विना भस्मे, जिपच्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे पाटील, कॉ.बबनराव पवार, अॅड कारभारी गलांडे, संदीप इथापे, संजय डमाळ, राम लांडे,  संध्या पोटफोडे, संगीता रायकर, अंजली भुजबळ, सुनीत्रा महाजन, एकनाथ कुसळकर, रावसाहेब जाधव, बाळासाहेब फटांगरे, प्रशांत भराट, भगवान गायकवाड, आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, आशा  कर्मचारी संघटना, राज्य किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, साई रिक्षा युंनियन आदी संस्था संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी चव्हाण, सातपुते, पानसरे, देवढे, दिलीपराव लांडे पाटील आदिची भाषणे झाली . विविध संघटनानी, व मान्यवरांनी उभयतांचा सत्कार केला. प्रारंभी कॉं गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पा हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काही तरुणांनी भाकपमध्ये प्रवेश केला. कॉ.बबनराव लबडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले तर अरविंद देशमुख यानी सूत्रसंचालन केले.