कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगांव विधानसभा मतदारसंघासाठी संजीवनी उद्योग समूह परोपकारी असून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचितांच्या अडचणी दूर केल्या, तर युवानेते विवेक कोल्हे यांनी तरुणाईसाठी उत्कर्षाचा विचार दिला असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी केले.
भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत संवत्सर पंचक्रोशीतील रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू व डोळे तपासणी करण्यात आली त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप शनिवारी मारुती मंदिर संवत्सर येथे करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी श्री भरत ढमढेरे होते. संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे यांनी प्रास्तविक केले.
ज्ञानेश्वर परजणे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी संवत्सर पंचक्रोशीतील रहिवासीयांच्या अडचणी सोडवत पूर्व भागात साठी विशेष लक्ष दिले. संवत्सर परिसरातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमातून मातीचे बंधारे, दगडी साठवन बंधारे, शेततळे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत.
याप्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक बापुसाहेब बारहाते, फकिरराव बोरनारे, रामभाउ कासार, किशोर परजणे, कचेश्वर रानोडे, कॅनरा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मोहन निकम, राजेंद्र बोरनारे, अशोकराव लोहकणे, प्रकाश बारहाते, कोपरगाव तालुका भाजप दिव्यांग तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, राजेंद्र नवाळे, गोविंद परजणे, राजकुमार बारहाते, गणेश साबळे, दिवाकर निळे, शांताराम शिंदे, अभिजित आबक, चिमा दैने यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.