शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : कुठे कर्ण कर्कश डीजेचा दणदणाट नाही की, कुठे आचकट विचकट उडत्या चालीच्या गाण्यावर थीरकणारी तरुणाई दिसली नाही. अखंड हिंदुस्तानचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीचे औचित्य साधून शेवगावात आयोजित केलेला मराठमोळा लोकधारा हा कार्यक्रम शेवगावकरांना विशेष भावला.
यावेळी शेवगावच्या ज्या भुमिपुत्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला त्यांना या निमीत्त शेवगाव भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम देखील संयोजकांनी राबविला. या मराठमोळ्या सोहळ्याचे कौतुक होत आहे. येथील खंडोबा मैदानावर उभारलेल्या भव्य शामियाण्यात मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी या
सार्वजनिक शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे होत्या. यावेळी जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, बाप्पूसाहेब भोसले, नगरसेवक महेश फलके, गणेश कोरडे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास पावरा, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, सुनिल रासने, दिलीप सुपारे, गोकुळ भागवत, वसुधा सावरकर, किरण पुरनाळे उपस्थित होते.
यावेळी राम महाराज झिंजुर्के म्हणाले , शिवछत्रपतींचे विचार विधायक उपक्रमातून आचरणात आणल्याशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाही. शिवजंयती उत्सवानिमीत्त अनावश्यक गोष्टींना फाटा देवून समाजात चांगले काम करणा-या व्यक्तींचा गौरव करणे हे सकारात्मक उर्जा निर्मीतीसाठी आवश्यक आहे.
यावेळी शेवगाव चे भूमिपुत्र पोलिस अधिक्षक तेजस्वि सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, ज्येष्ठ उद्योजक, अर्थतज्ञ डी. एस काटे, श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस, तहसिलदार संतोष काकडे, पत्रकार कैलास बुधवंत, सचिन सातपुते, पोलिस उपनिरीक्षक पुजा अंधारे, नाट्य दिग्दर्शक उमेश घेवरिकर, सावली दिव्यांग संघटनेचे चाँद शेख, महाराष्ट्र खो-खो संघाचा कर्णधार नरेंद्र कातकडे, राष्ट्रीय खो-खो खेळाडू शिवम बामदळे, डॉ. नितीन नागरगोजे, युवा उद्योजक जयप्रकाश धूत, चित्रकार सुरेश तेलुरे, सामाजिक कार्यकर्ते गौरी व कृष्णा महाराज कु-हे, प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब रहाटळ आदींना शेवगाव भुषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप खरड़, डॉ.नीरज लांडे पाटील, नवनाथ कवडे, जगदीश धूत, डॉ.कृष्णा देहाडराय, संदिप जावळे, संदिप देशमुख, संजय बोरुडे, अमिन सय्यद आदींचे योगदान लाभले. गणेश रांधवणे यांनी प्रास्ताविक तर दिपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. वसुधा सावरकर यांनी आभार मानले.