माझा सन्मान मतदार संघातील सर्व महिलांचा सन्मान – चैताली काळे

Mypage

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १३ : मला समाज कार्याची प्रेरणा हि मतदार संघातील महिलांकडून मिळते त्यामुळे ज्या ज्यावेळी माझ्या समाज कार्याबद्दल माझा सन्मान केला जातो तो सन्मान माझा नसून तो सन्मान मतदार संघातील प्रत्येक महिलेचा असल्याचे प्रतिपादन अहमदनगर सहकारी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.

Mypage

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजयोग अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्र साईनगर कोपरगाव यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला सबलीकरणासाठी अविरतपणे काम करीत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

Mypage

त्या पुढे म्हणाल्या की, मेडिटेशनचे असंख्य फायदे असून राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी यांनी अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्राच्या माध्यमातून कोपरगावसह नासिक विभागात मोठे काम केले आहे. मेडिटेशनच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असून त्यांच्या अनुयायांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

Mypage

काळे परिवाराचा समाज कार्याचा वारसा पुढे चालवितांना महिला सबलीकरणासाठी माझे प्रेरणास्थान मतदार संघातील सर्व महिला आहेत. मतदार संघातील प्रत्येक स्त्री जी गृहिणी असेल, उद्योग व्यवसाय करीत असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, शासकीय सेवेत असेल किंवा ती महिला बचत गटाची सदस्य असेल या प्रत्येक महिलांकडून मला प्रेरणा मिळत असते. त्यामुळे समाज कार्यासाठी मला खऱ्या अर्थाने उर्जा मिळते. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक महिला सन्मानास पात्र असून मला मिळणारा सन्मान हा मतदार संघातील सर्व महिलांना समर्पित करीत असल्याचे सौ. चैतालीताई काळे यांनी यावेळी सांगितले.

Mypage

याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, माजी आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे, सौ. सुधा ठोळे, सौ. स्वाती कोयटे, सौ.सिमरन खुबाणी, सौ.शीतल वाबळे, सौ.रश्मी जोशी, सौ.मनजीतकौर पोथीवाल, सौ.रेखा उंडे, सौ.अनुपमा बोर्डे, सौ.लता भामरे, सौ.संजीवनी शिंदे, श्रीमती मंगल वल्टे, सौ.पुजा शर्मा, सौ.रत्ना पाटील, माजी नगरसेवक गटनेते विरन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, 

Mypage

सौ. माधवी वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस सौ. रेखा जगताप, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, अॅड. शंतनु धोर्डे, अशोक आव्हाटे, नारायण लांडगे, ठकाजी लासुरे, अर्जुन डूबे, अॅड. मनोज कडू, शुभम लासुरे, सुमित भोंगळे, सौ.गौरी पहाडे, बेबीआपा पठाण, सौ.रश्मी कडू, सौ.सुषमा पांडे, सौ.रुपाली कळसकर, सौ.शितल वायखिंडे, सौ.भाग्यश्री बोरुडे, सौ.नंदा लासुरे, सौ.छाया फरताळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Mypage

फोटो ओळ- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजयोग अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्र कोपरगाव येथे आयोजित महिला गौरव सोहळा कार्यक्रमात बोलतांना सौ. चैतालीताई काळे समवेत राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, माजी आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे आदी.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *