शहराध्यक्षाची लायकी नसतांना कोल्हेंना पाकीट वाढवावे लागणार – कृष्णा आढाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : सत्तेची हाव किती असावी याला देखील काही मर्यादा असतात. परंतु ज्यांचा चार वर्षापूर्वी पराभव होवूनही स्वत:ला विद्यमान आमदार समजणाऱ्या कोल्हेंना त्यांच्याच लायकी नसणाऱ्या पाकीटवाल्या अध्यक्षांनी माजी आमदार असल्याचे लक्षात आणून दिल्यामुळे आता या शहराध्यक्षाची लायकी नसतांना कोल्हेंना पाकीट वाढवावे लागणार आहे. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्यावर केली दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कृष्णा आढाव यांनी पुढे असे म्हटले आहे की, प्रयत्न करणे आणि प्रत्यक्षात करणे यात मोठा फरक आहे. माजी आमदार कोल्हे यांनी पाच वर्ष प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कोपरगाव शहराचा विकास होवू शकला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी किती निधी आणला हे पाकीटवाल्या अध्यक्षांनी माजी आमदार कोल्हेंना खाजगीत विचारला पाहिजे. तुमच्या काळात व्यापारी संकुलासाठी दमडीचाही निधी आला नाही व एकही व्यापारी संकुल उभे राहू शकले नाही.

असे असतांना ज्याप्रमाणे संगमनेर बस स्थानकाच्या सभोवताली व्यापारी संकुल उभारण्यात आले त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानक देखील उभारले जावून व्यापारी संकुलाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीवाढ होईल अशी कोपरगावकरांना अपेक्षा होती. मात्र, माजी आमदार कोल्हेंनी हे बसस्थानकच चुकीचे बांधल्यामुळे शहरातील व्यवसायवाढीला चालना मिळाली नाही. त्यामुळे कोपरगावच्या बाजार पेठेबाबत माजी आमदार कोल्हे किती गंभीर होत्या हे कोपरगावची जनता जाणून आहे. त्यामुळे २०१९ ला त्यांना कोपरगावकरांनी सरप्राईज गिफ्ट दिले आहे परंतु सत्तेच्या हव्यासापोटी त्यांचा पराभव त्या आजपर्यंत पचवू शकल्या नाही.

त्यामुळे मागील चार वर्षात आपणच आमदार असल्याचे भासवत सत्ता असतांना जे जमले नाही ते सत्ता नसतांना मी हे केले, मी ते केले सांगून नेहमीच प्रथम लोकनियुक्त महिला आमदार असे जाहीरपणे सांगणाऱ्या माजी आमदार कोल्हेंना त्यांच्या पाकीटवाल्या अध्यक्षांनी सध्या आमदार आशुतोष काळे असल्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे या शहराध्यक्षाचे पाकीट वाढविण्याची नामुष्की कोल्हेंवर आली असल्याची टीका कृष्णा आढाव यांनी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्यावर केली असून आपले पाकीट वाढवून घेण्यासाठी एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा काय मदत केली? हे जाहीरपणे सांगावे असे आवाहन केले आहे.