अज्ञानी व भाडोत्री पोपट पुढे करने हीच काळे गटाची अवस्था – दत्ता काले

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : आमदार काळे यांची अकार्यक्षमता त्यांच्या कार्यकर्त्यानी त्यांच्याच विरोधात आंदोलन करून सिद्ध केली आहे. त्यातीलच ज्यांची पात्रता स्वतः पाकिटावर जगण्याची आहे. त्याने कुणावर पाकिटाचा आरोप करने हास्यास्पद आहे. आमदार काळे हे स्वतः निष्क्रिय आहे. त्यामुळे त्यांना आता स्वतःला घरचा अहेर देणाऱ्या अशा भाडोत्री पोपटाकरवी कोल्हेंवर टीका करावी लागते आहे. ज्यांची उभी हयात कोल्हे गटाच्याच मदतीने चालली आहे. त्याने भाजपा पदाधीकाऱ्यांवर टीका करने केविलवाणे आहे. चावी दिल्यावर बोलतो असा भाडोत्री पोपट म्हणून कृष्णा आढाव यांची ओळख शहरात आहे. अशी जळजळीत टीका भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आढाव यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना केली आहे.

Mypage

स्नेहलता कोल्हे यांच्या निधीतून झालेली विकासकामे यावरच रेघोट्या मारण्यात आमदार काळे दंग आहे. काळे यांचा कारभार म्हणजे स्विय्य सह्यय्यकाचा विकास आणि गाव मात्र, केले भकास अशी गत झाली आहे. कोल्हे यांचे पाय धरुन कृष्णा आढाव यांनी काय विनंत्या केल्या होत्या हे जगजाहीर आहे. मला पद हे माझ्या कर्तुत्वाने मिळाले आहे. त्यासाठी मला मोबाईल बंद करून बंड करून भूमिगत होण्याची वेळ आली नाही. आढाव यांचे अनेक असे पडद्यामागील कारभार जनतेला लवकरच कळणार आहेत.

tml> Mypage

एकीकडे उजेडात आमदार काळे यांना बेगडी निष्ठा दाखवायची आणि दुसरीकडे अंधारात त्याच आमदार काळे यांना लाखोल्या वहायच्या हा तुमचा दुटप्पी धंदा उघड आहे. पदाच्या तुकड्यासाठी तुम्हाला पक्ष सोडतो अशा वावड्या उठवाव्या लागल्या. मात्र, मला भाजपाने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कोल्हे यांनी दुसऱ्यांदा शहराध्यक्ष केले व विश्वास दाखवला हा आपल्यात फरक आहे. तुकड्यावर जगणारे आणि पाकिटावर बोलणारे कृष्णा आढाव यांनी आज पर्यंत कुणाला एक चहा फुकट पाजला नाही हे शहराला ठाऊक आहे.

Mypage

आमच्या निष्ठेवर काही बोलणे ही आमदारांना काही काम करता येत नाही. त्यामुळे तुमची पातळी घसरून आमदार आणि त्यांचे बालिश बगलबच्चे यांना जनता २०२४ ला योग्य सरप्राइज देईल. तुमची गॅरंटी घेण्यासाठी बाहेरून लोक आणावे लागतात. त्यातच तुमची क्षमता कोल्हे यांची बरोबरी करण्याची नाही. कर्तुत्व वाढवा आणि मग टीकेचे पुरस्कर्ते व्हा. असा वडिलकीचा सल्लाही काले यांनी आढाव यांना दिला आहे.

Mypage

कृष्णा आढाव यांनाही पाकीटाची सोय करण्यासाठी बातम्या इच्छा नसताना स्वतःचे नाव वापरून देणे यातच त्यांची अवस्था उघड झाली आहे.आमदार काळे यांची निष्क्रियता झाकण्यासाठी केविलवाणी धडपड काळे गट करतो आहे.आगामी काळात कृष्णा आढाव यांचे अनेक कारनामे शहरसमोर उघड करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत त्याबद्दल त्यांनीही निश्चंत रहावे असा खोचक सल्ला काले यांनी दिला आहे.