रेणुका मल्टीस्टेट अमरापूर शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि.२०: विविध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा साता समुद्रा पलिकडे उमटविणारे, श्रीरेणुका माता मल्टी स्टेट या अग्रगण्य संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ.प्रशांत चंद्रकांत भालेराव आपल्या अत्यंत व्यस्त कारभारातून देखील नियमित पणे श्रीरेणुका मातेच्या चरणी लिन होतात. आजही ते माहूरच्या वारीला गेले आहेत. हा त्यांच्या वरील संस्काराचा परिपाक आहे. त्यामुळेच श्रीरेणुका माता आईसाहेबाच्याच नावाने सुरु केलेल्या मल्टीस्टेट संस्थेचा वटवृक्ष दिवसेदिवस बहरतो आहे. असे प्रतिपादन आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महारा झिंजुर्के यांनी येथे केले.

श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता मल्टीस्टेट या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा श्रध्देय ह.भ.प. राम महाराज, तारकेशवर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१९) सपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. महाराज म्हणाले, श्री रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. डॉ.प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनानुसार या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रसंगाचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवीले जातात.

श्री क्षेत्रअमरापूर शाखेने अवध्या तिसऱ्या वर्षी ७०० खातेदारांना सेवा देत तब्बल १० हजार कोटीवर ठेवीचा पल्ला गाठला असून येथे एटीएम, लॉकर सह सर्वप्रकरच्या बँकिंग सेवा उपलब्ध आहेत.

यावेळी देखील नेत्र रोग तपासणी शिबीराचे येथे आयोजन करण्यात आले होते. पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ.मिरा पटारे यांच्या पथकाने ६४ नेत्र रुग्णाची तपासणी केली. पैकी १६ रुग्णावर २७ डिसेंबर रोजी पुणे येथे मोफत शस्रक्रीया करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेत दोन दिवस नवचंडी याग पूजा करण्यात आली. सरव्यवस्थापक अश्वलिंग जगनाडे व पत्नी पूजेसाठी बसले. यावेळी रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव, जयंती भालेराव, सरपंच, आशा गरड, उपसरपंच गणेश बोरुडे, कृष्णा महाराज मुळीक, उद्धव महाराज सबलस, काका महाराज मुखेकर, डॉ. अरविंद पोटफोडे, ज्ञानेश्वरचे संचालक बबन भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर, विजय पोटफोडे, कृषी आधिकारी राहूल कदम, प्रा.जनार्दन लांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे व शाखा व्यवस्थापक महेश कर्डिले यांनी सर्वांचे स्वागत केले. पासिंग ऑफिसर कोमल ढोले योनी सुत्रसंचलन केले. रोखपाल सिमा आहेर यांनी आभार मानले.