श्रीराम नवमी उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दि.९ एप्रिल ते २० एप्रिल विविध कार्यक्रम आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : शेवगाव व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात सर्वत्र श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठीक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने त्यात सहभाग घेतला. शेवगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयापासून प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई, यांच्या मूर्तीच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी  ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

शहरातील विविध चौकातून बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक श्रीराम मंदिर देवस्थानाच्या परिसरात पोहोचली. त्यावेळी प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची आरती घेण्यात आली. श्रीराम मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मंगळवार दि.९ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत श्रीराम नवमी उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने काकडा, आरती, श्रीराम रक्षा, भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालीसा पठण, व श्रीराम प्रभूंची आरती, असे विविध कार्यक्रम आहेत.

सोमवार दि. १५ एप्रिल पासून बुधवारी १७ एप्रिल पर्यंत श्रीराम नवमी निमित्ताने मंदिर देवस्थान समितीच्या वतीने ह. भ. प. विकास बुवा दिग्रसकर पुणे यांचे त्रीदिनात्मक कीर्तन पार पडले.

बुधवारी श्रीराम नवमीच्या निमित्ताने ह. भ. प. दिग्रस बुवा यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. देवस्थान समितीचे सुहास गालफाडे, अश्विनी गालफाडे, राजेंद्र गालफाडे, प्रकाश गालफाडे, उदय मुंडे यांच्यासह विश्वस्त समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच श्रीराम भक्तांची उपस्थिती होती.

महिलांची उपस्थिती लक्षणीय होती गुरुवारी दि. १८ एप्रिल रोजी श्रीराम प्रभूंचा पालखी सोहळा व शुक्रवारी दि. १९ एप्रिल रोजी पाथर्डी येथील कु. हरीप्रिया जाटदेवळेकर यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.