ज्या क्षेत्राची आवड, तेच क्षेत्र निवडा – चैताली काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा. भविष्यात ज्या क्षेत्राची आवड आहे तेच क्षेत्र निवडून जीवनात यशस्वी होवून आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल करा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी ग.र. औताडे पाटील माध्यमिक विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या ग.र. औताडे पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करतांना त्या बोलत होत्या.

tml> Mypage

त्या पुढे म्हणाल्या की, आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे नक्की ठरवा त्याबाबत आपल्या पालकांशी चर्चा करून त्याचा नियोजनबद्ध पाठपुरावा केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मात्र, आई-वडील म्हणतात व आपल्या मित्र-मैत्रिणीने निवडले म्हणून ते क्षेत्र निवडू नका. हे स्पर्धेचे युग असून या युगात केवळ गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा राहिलेला नाही. त्याच्या जोडीला व्यक्तिमत्त्व, अवांतर वाचन, संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण,  समयसूचकता आदी गुण देखील जीवनात यश मिळविण्यात महत्त्वपूर्ण ठरतात.

Mypage

त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करावा कारण ती खरी काळाची गरज आहे. आपल्याला शाळेने दिलेले आचारविचार, केलेले संस्कार, देऊ केलेली सकारात्मक दृष्टी, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा या सर्व गोष्टींच्या बळावर व अविरत  प्रयत्नांच्या जोरावर आपण यश नक्कीच मिळणार हा आत्मविश्वास बाळगा. भविष्यात तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे सदैव खंबीरपणे उभे आहोत असा आश्वासक आधार देवून येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Mypage

यावेळी एम.टी. रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविण शिंदे, गंगाधर औताडे, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र औताडे, योगेश औताडे, नंदकिशोर औताडे, इंदुमती औताडे, सविता देशमुख, ठाणगाव पाडळी शाळेचे प्राचार्य शांताराम देशमुख, वाल्मिक नवले, प्राचार्य शिंदे सर, कमलाकर शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Mypage