पाणी पुरवठा योजनात त्रुटी राहणार नाही – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२  :- कोपरगाव मतदार संघातील सुरु असलेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचे काम हे वारंवार होणार नाही हे अधिकारी व ग्रामस्थ यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनात कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेवून या पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

Mypage

कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरु असलेल्या अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आ. आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणचे अधिकारी व त्या त्या गावातील ग्रामस्थांसमवेत आढावा घेतला. या योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामात येत असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

tml> Mypage

कोपरगाव मतदार संघातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला जावा. यासाठी कोपरगाव शहराबरोबरच मतदार संघातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी २७० कोटी निधी आणला आहे. या निधीतून अनेक गावातील पाणी योजनांचे काम पूर्णत्वाकडे जात असून काही गावातील कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, काही पाणी पुरवठा योजनांची कामे संथ गतीने चालू आहे.

Mypage

त्यामुळे या कामांना वेग द्या. ज्या ठिकाणी योजनेचा विस्तार करण्याची आवश्यकता असेल त्या पाणी योजनेचा वाढीव प्रस्ताव तयार करा. अशा पाणी पुरवठा योजनांसाठी नेहमीच निधी मिळत नाही. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांसह वाडी वस्तीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे याची दक्षता घ्या व पाणीपुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Mypage

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, अनिल कदम, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक संदीप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव मधुकर टेके, माजी संचालक अरुण चंद्रे, माजी उपसभापती वाल्मिक कोळपे, बद्रीनाथ जाधव, नामदेव जाधव, शिवाजी बाचकर, सतिष कदम, दिपक चौधरी, सर्जेराव घायतडकर, बाळासाहेब पवार, दिगंबर बढे, मुकुंद गाडे, भगवान गाडे, विलास दवंगे, महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणचे लोहारे, कदम, मिटकरे, सर्व गावांतील ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Mypage