कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची कॅनडा व अमेरिकेमधिल विद्यापीठांमध्ये एमएस (मास्टर ऑफ सायन्स-अभियांत्रिकी मधिल पदव्युत्तर पदवी) शिक्षणासाठी निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुर्ण खर्चासाठी त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा संस्थांमधिल विध्यार्थ्यांची परदेशात एमएस करण्यासाठी मोठ्या संख्येने निवड होते. मात्र संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी संजीवनी मधुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर परदेशी विद्यापीठांच्या सर्व कसोट्या पुर्ण करून बाजी मारली. अनेक सदन कुटूंबातील भारतीय विध्यार्थी विविध शिक्षणासाठी परदेशात जातात. परंतु संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयत्नामुळे ग्रामिण भागातील सर्व सामान्य कुटूंबातील मुलं १०० टक्के शिष्यवृत्तीच्या खर्चातुन परदेशात शिकायला जाणार, ही बाब संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.
यात अंतिम वर्षाच्या ओंकार कैलास राहणे याची इलिनाॅईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी सिकागो, नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन, दि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास व सिरॅकाॅज युनिव्हर्सिटी न्युयाॅर्क मध्ये एम.एस. साठी निवड झाली आहे. चैतन्य संतोष टेकणे याची युनिव्हर्सिटी ऑफ माॅन्टरिअल, वैष्णवी विनोद नाईकवाडे हिची व संकेत सुरेश इंगळे याची काॅन्काॅर्डिया युनिव्हर्सिटी कॅनडा मध्ये एमएस साठी निवड झाली आहे.
या सर्वांचा दोन वर्षांचा खर्च त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधुन होणार आहे. या चारही विध्यार्थ्यांच्या अंतिम निकालानंतर ते एमएस करण्यासाठी परदेशी रवाना होणार आहे. या विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डाॅ. महेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.