७४.८१ कोटी अतिवृष्टी मदत निधी अहवाल शासनास सादर – तहसीलदार वाघ

शेवगाव प्रितिनिधी, दि. ९ : ऑक्टोबर २०२२ मध्ये शेवगाव तालुक्यात झालेल्या पाच मंडळातील अतिवृष्टीमुळे ९४ गावातील ६८ हजार ५६ शेतकऱ्यांच्या एकूण ४९ हजार १८ हेक्टर क्षेत्रातील विविध पिके बाधित झाली. या शेतकऱ्यांना मदत म्हणून ६६ कोटी ६६ लाख ४४ हजार आठशे रुपये तर एरंडगाव मंडळात झालेल्या सततच्या पावसामुळे १९ गावातील ११ हजार २७८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रातील बाधित झालेल्या पिकांसाठी त्यांना ८ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये  असा एकूण ७४ कोटी ८० लाख ४० हजार ८०० रुपये अपेक्षित निधी मंजूर करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी दिली.

       हा मदत निधी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये प्रमाणे देण्यात येणार असून जास्तीत जास्त ३ हेक्टर क्षेत्राची मर्यादा निश्चीत केली आहे. शेवगाव तालुक्यातील ६८हजार ५६ शेतकऱ्यांच्या एकूण ११८३ हेक्टर बाजरी, ४३४  हेक्टर मूग, १५९ हेक्टर उडीद , ९२६ हेक्टर सोयाबीन ,३८ हजार ८८७  हेक्टर कपाशी , २७१ हेक्टर मका, ७ हजार१८ हेक्टर तूर १४७ हेक्टर भईमुग असे एकूण ४९ हजार १८ हेक्टर  क्षेत्र बाधित झाले आहे.

        तालुक्यातील शेवगाव, बोधेगाव ,चापडगाव, ढोरजळगाव, व भातकुडगाव या पाच मंडळामध्ये गेल्या ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाल्याने या मंडळातील बहूतेक  पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली .त्यात बोधेगाव मंडळातील  २२ गावातील  सर्वाधिक १५  हजार ३१९ शेतकऱ्याच्या १५ हजार१७३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना  फटका बसला असून त्यातील तब्बल १२ हजार ६०७  हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. या मंडलास २० कोटी६३ लाख ५२ हजार८००रु.निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

अन्य मंडळाचा नुकसानीचा, निधी व शेतकरी संख्येचा तपशील खालील प्रमाणे
शेवगाव मंडल – २१ गावे  १६ हजार १२३ शेतकरी बाधित क्षेत्र १० हजार  ८०४  हेक्टर. निधी१४ कोटी ६९ लाख ३४ हजार ४०० रुपये ढोरजळगाव मंडल – १८ गावे, १४हजार ५१ शेतकरी बाधित क्षेत्र  ८ हजार  १२९ हेक्टर. निधी ११ कोटी ५ लाख ५४ हजार रुपये भातुकडगाव मंडल – १७ गावे १२ हजार २४५ शेतकरी ७ हजार९० हेक्टर. निधी ९ कोटी ६४ लाख २४ हजार रुपये, चापडगाव मंडल – १६ गावे, १० हजार ३१८ शेतकरी ७ हजार ८२२ हेक्टर. निधी -१० कोटी ६३ लाख ७९ हजार २०० रुपये

       तर सततच्या पावसाने एरंडगाव गटात झालेल्या सततच्या पावसाने १९  गावातील ११हजार२७८  शेतकऱ्यांचे ८५ हेक्टर बाजरी, ४  हेक्टर मूग, २० हेक्टर उडीद, ६३ हेक्टर सोयाबीन , ५ हजार ९०हेक्टर कपाशी, ५२  हेक्टर मका, ६४८ हेक्टर तूर , २३ हेक्टर भुईमूग अशा ५ हजार९८५ हेक्टर क्षेत्रापोटी आठ कोटी तेरा लाख ९६ हजार रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.