कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला 

Mypage

१८ डिसेंबर २०२२ रोजी होणार मतदान

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी दि. ९ :  गेल्या अनेक दिवसांपासून मुदत संपून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असुन आता पुन्हा जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

Mypage

राज्य निवडणुक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३४० ग्रामपंचायतीच्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची व थेट सरपंचाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे. त्यामध्ये भोजडे, सडे, शिंगणापूर, वेस सोयगाव, कोळपेवाडी, वडगाव, मोर्वीस, खिर्डी गणेश, पढेगाव, चासनळी,रांजणगाव देशमुख, माहेगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, देर्डे को-हाळे, तळेगाव मळे, चांदेकसारे, धारणगाव ,हांडेवाडी, बक्तरपुर, सोनेवाडी, खोपडी, करंजी बुद्रुक, बहादरपूर या ग्रामपंचायतीच्या सामावेश आहे.

Mypage

तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी तहसीलदार निवडणुक नोटीस प्रसिद्ध करणार. २८ नोव्हेंबर  ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशन पञ मागविण्याची व भरण्याची अंतिम तारीख, उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत राहील.

Mypage

त्याच दिवशी दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी  मतदान होणार असणार असुन मतदानाची वेळ सकाळी ७:३० सायंकाळी ५:३० पर्यंत असणार तर मंगळवारी सकाळी नियोजित जागेत मतमोजणी होणार असल्याची माहीती निवडणूक आयोगाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Mypage

 दरम्यान नविन वर्षात नव्या सदस्यांसह जनतेतून सरपंच निवडले जाणार असल्याने तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये आजपासुन लगबग सुरू झाली आहे, तर शासकीय यंञणा नियोजीत आराखडा करण्याच्या तयारीला लागली आहेत.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *