यंदा गणेशोत्सवात डीजेचा आवाज घुमणार नाही

शांतता कमिटीत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांची सूचना

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, वाद्यधारक यांच्या शेवगाव पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयावर सांगोपांग चर्चा करून यंदा गणेशोत्सवात डीजेचा आवाज घुमणार नाही अशा स्वरूपाचे बंधनकारक निर्णय घेण्यात आले आहेत. हा निर्णय थोडा शिथील करावा अशी काहींची मागणी होती. मात्र या निर्णयावर उपअधिक्षक पाटील ठाम राहिले.

यावेळी गणेश मंडळांनी गणेश मुर्तीची स्थापनेपूर्वी घ्यावयाची कायदेशीर परवानगी घ्यावी,  मंडप रस्त्याला अडथळा होईल अशा ठिकाणी नसावा, विज कनेक्शन रीतसर कोटेशन भरून घ्यावे, श्रींच्या मुर्तीजवळ कायमस्वरूपी स्वयंसेवक असावेत, सार्वजनिक मंडळात देखावे दाखवितांना जातीय, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पर्यावरण व सामाजिक उदबोधनात्मक देखावे सादर करण्यावर भर द्यावा.

मंडप परिसरात मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे  लावावेत, गणेश विसर्जन प्रसंगी श्रींच्या मुर्तीची विंटबना होणार नाही या बाबतची काळजी घ्यावी. तसेच सण उत्सव काळात सोशल मिडीयाचे माध्यमातुन कुठल्याही धर्मांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या.

 यावेळी पोलिस निरीक्षक समाधान नागरे, नगरपरीषदेचे ओ.एस. सुनिल पगारे,  महावितरणचे प्रभारी उपअभियंता विश्वास नरके, शहर अभियंता पगारे  सार्वजनिक विभागाचे स्थापत्य़ साहाय्य़क अभिंयता सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, संजय फडके, दत्ता फुंदे, सुनिल आहुजा, कॉ. संजय नांगरे, मनीष बाहेती,  डॉ. नीरज लांडे पाटील, सतीश मगर, अविनाश देशमुख यांच्यासह शहरातील विविध मानाच्या गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी  उपस्थित होते.

येथील  मानाच्या गणपती मंडळाचे गणेश मंडळाचे आचल लाटे भोईराज मंडळाचे कमलेश लांडगे भगतसिंग मंडळाचे  नवनाथ कवडे मनोज कांबळे शैलेश बंब तुषार पुरनाळे राहुल सावंत या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेऊन समस्या मांडल्या. 

Leave a Reply