लक्ष्मणराव पावसे पाटील यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : येथील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव उर्फ जिजा भिमाजी पावसे पाटील (वय ८९) यांचे  वृद्धापकाळाने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या राहत्या गावी खाम पिंपरी येथे  त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी विविध स्थरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, घुले पाटील जिनिंग प्रेसिंगचे संचालक  बाप्पासाहेब, जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी विठ्ठलराव व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक शंकरराव पावसे ही तीन मुले, दोन विवाहित  मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

   कै . पावसे पाटील  लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी खाम पिंपरीचे ३५ वर्षे सरपंच, कृ .उ. बाजार समितीचे पाच वर्ष सभापती तर पंचायत समिती सदस्य म्हणून पंधरा वर्षे उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे.