आहार व व्यवहार या विषयावर शेवगाव ग्रामिण रुग्णालयात शिबिराचे आयोजन


शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रूग्णालय शेवगाव व उचल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्धर आजाराने ग्रस्त स्त्री रुग्णांना एक मायेची ऊब निर्माण व्हावी. तसेच रुग्णासमवेत माणुसकीचे नाते निर्माण करून त्यांच्यामध्ये सामाजिक जीवन जगण्यासाठी नवचैतन्य निर्माण व्हावे व सकारात्मक जीवन कसे जगावे यासाठी आहार व व्यवहार या विषयावर शेवगाव ग्रामिण रुग्णालयात एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले. याप्रसंगी एकात्मिक केंद्राच्या रुग्ण महिलांना डॉ. काटे यांचे हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या. एक्स-रे विभाग प्रमुख आयुब शेख, क्षय रोग विभागा महेश बोंडवे, राजगुरू सिस्टर एकात्मिक सल्ला चाचणी केंद्राचे पी.एम. मुलगे लॅब टेक्निशन व समुपदेशक सुजाता दहिफळे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

यावेळी शेवगाणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रात्साविक शेवगाव रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष भागनाथ काटे यांनी केले. उचल फाऊंडेहानचे साचिन खेडकर यांनी सुत्र संचलन केले. वसुधा सावरकर यानी आभार मानले.