शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : राज्यमार्ग परिवहन महामंडळ व पुण्याच्या लाईल व्हिजन मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बुधवारी करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेवगाव आगारात चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय विभाग मिळून एकूण २६९ सेवक वर्ग असून ऐनवेळच्या सुचने नंतरही तब्बल १७५ जणांनी शिबीराचा लाभ घेऊन नेत्र तपासणी केली.
तपासणी शिबीराचा शुभारंभ आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांचे हस्ते यांत्रिक विभागाचे अधिक्षक अनमोल फंड, कार्यालयीन अधिक्षक आदिनाथ लटपटे, स्थानक प्रमुख किरण शिंदे, सहाय्यक सोमनाथ देवढे, गणेश दारकुंडे, माधुरी कोल्हे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
लाईल व्हेजन फाऊंडेशनचे डॉ. महेश पाटील, साई किरण, सुलभा लिमये यांनी नेत्र तपासणी केली. या शिबीरात १६ जणांना मोतीबिंदू आढळला. त्यांचेवर पुणे येथील लाईल व्हिजन मेडिकल फाऊंडेशन च्या रुग्णालयात नविनामुल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.