विजयादशमी निमित्त श्री रेणुका माता देवस्थानात कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : विजयादशमी निमित श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात मोठया उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी उशीरा श्री परशुरामाची पालखी काढून शिमोलंघन करण्यात आले. भाविकांनी एकमेकांना सोने देत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळी श्री रेणुका आईसाहेबांना दुधाचा महा अभिषेक घालून महानैवैद्य दाखवण्यात आला. साडेअकराला महाआरती करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता श्री परशुरामांची पालखी काढण्यात आली. देवस्थानातील विविध मंदिरात पालखी नेऊन भाविकांनी आरती केली. रेणुका भक्तानु रागी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, रुद्र भालेराव यांचे हस्ते शमी व शस्त्र पूजन करण्यात आले. श्री रेणुका मंदिराच्या प्रवेशद्वारात कुसुमांड बली देण्यात येऊन  मंदिर प्रवेश करण्यात आला. त्यानंतर साडेसहाला असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

सकाळी श्री रेणुका आईसाहेबांना दुधाचा महा अभिषेक घालून महानैवैद्य दाखवण्यात आला. साडेअकराला महाआरती करण्यात आली. तर सायंकाळी पाच वाजता श्री परशुरामांची पालखी काढण्यात आली. देवस्थानातील विविध मंदिरात पालखी नेऊन भाविकांनी आरती केली. रेणुका भक्तानु रागी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, रुद्र भालेराव यांचे हस्ते शमी व शस्त्र पूजन करण्यात आले. श्री रेणुका मंदिराच्या प्रवेशद्वारात कुसुमांड बली देण्यात येऊन  मंदिर प्रवेश करण्यात आला. त्यानंतर साडेसहाला असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

यावेळी रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव, जयंती भालेराव, श्रीमंत घुले, बाळासाहेब चौधरी, शिवसेनेचे रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, जेऊरचे रामदास खराडे, जनार्दन लांडे यांचे सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.