शेवगावात राष्ट्रवादी काँग्रेसने केला सरकारच्या दडपशाहीचा निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळातील पक्षनेते  जयंत पाटील यांना दडपशाहीचे राजकारण करत विधानसभा सभागृहात निलंबित करण्यात आले. याबद्दल शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा आज शुक्र्वारी जाहीर निषेध नोंदवण्यात आला. तसेच त्यांचे निलंबनत लगेच मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले.

      निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली तर सरकारचे अपयश उघड होईल या भीतीपोटी अध्यक्षां मार्फत ही दडपशाही केली गेली आहे. जनतेच्या प्रश्नांना सामोरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या या दडपशाहीचा  आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.

      यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, अरूण पाटील लांडे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, युवक तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, शहरध्यक्ष कमलेश लांडगे, नाना मडके, कैलास तिजोरे, संतोष जाधव, वाहाब शेख, समिर शेख, तुफैल मुलानी, महेश दातीर, संकेत वांढेकर, गोविंद किंडमिचे, अशफाक पठाण, गणेश साळवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.