योगतज्ञ वैशंपायन यांचे शिष्य नर्मदा परिक्रमेसाठी रवाना

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या येथील शिष्य परिवारातील ज्येष्ठ साधक पी. बी. शिंदे, लक्ष्मण ज्योतिक, कान्हो गिते, रमेश कंठाळी हे चौघे पायी नर्मदा परिक्रमेसाठी रवाना झाले असून ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून सुमारे साडेतीन हजार किलोमीटरची व साडेतीन महिने कालावधीची पायी नर्मदा परिक्रमा सुरु करणार आहेत.

Mypage

यानिमित्ताने शिंदे यांच्या निवासस्थानी पूजा अर्चा व महाआरती करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव दत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव रोकडे, डॉ. सुभाष बाहेती, हनुमान जोशी, पुरुषोतम धूत, सुभाष गोलांडे, वसंत देवधर, दता फुंदे, शिरीष भारदे आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

tml> Mypage