शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी – टाकसाळ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी असून त्यासाठी विद्यार्थी युवकांनी चांगले शिक्षण व रोजगार हक्कासाठी सतत संघर्ष केला पाहिजे असे प्रतिपादन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राष्ट्रीय महासचिव कॉ ॲड अभय टाकसाळ यांनी केले. शेवगाव येथे आयोजित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या जिल्हा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

टाकसाळ पुढे म्हणाले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच चौदा वर्षांपर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे म्हणून तरतूद केली. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत आता केजी टू पीजी शिक्षण मोफत केले तरच सर्वांना समान संधी मिळेल, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसाय देवून बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत ‘जगामध्ये भारत तरूणांचा देश आहे. तरुणांना बेकारीच्या खाईत लोटने म्हणजे जातिय, धार्मिक उन्मादाला व अराजतेला खतपाणी घालणारे ठरेल याची सरकारने नोंद घ्यावी.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष पाटील लांडे, जिल्हा सेक्रेटरी कॉ ॲड. बन्सी सातपुते, प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी ही  मार्गदर्शन केले. या शिबिरात प्रज्ञा उगले, अभी बोरुडे,अक्षय साखरे, यश बोरुडे, अजिंक्य लहासे, सूरज नागरे, राजेंद्र वाघमारे, रुद्र पवार, विश्वकर्मा अमरनाथ, बुचडे सार्थक, अमोल तुजारे, आदित्य लांडे, अफरोज शेख, ज्ञानेश्वर राशिनकर, सायली राहुल वरे, राज राहुल वरे, ओम साखरे, आदित्य भुजबळ आदिंसह विद्यार्थी युवकांनी सहभाग घेतला होता. कॉ. संजय नांगरे यांनी प्रास्ताविक केले, तर संदिप इथापे यांनी आभार मानले.