महात्मा फुले शिक्षक परिषदेचा विवेक कोल्हेंना जाहीर पाठिंबा

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २३ : महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जळगाव शाखेच्या वतीने नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवत असणारे अपक्ष उमेदवार विवेक बिपिनदादा कोल्हे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

 या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी कोल्हे यांना आपल्या संघटनेच्या वतीने पाठिंब्याबाबतचे पत्र दिले आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भावेश पाटील, जिल्हा सहसचिव चंद्रकांत पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष कृष्णराव पाटील, कार्यकारणी सदस्य स्वप्निल बागुल,  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांचे समवेत ग. स. पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रवींद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विकास तात्या पाटील, अजय दादा देशमुख, अनिल दादा सोनवणे, ॲड.पियुष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवसेंदिवस चुरस वाढली आहे. या निवडणुकीत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले युवा नेतृत्व कोल्हे विवेक बिपिनदादा यांची लोकप्रियता व मतदारांना त्यांनी दिलेले ठोस आश्वासन लक्षात घेता पुरोगामी विचारसरणीच्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेने विवेक कोल्हे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पुरोगामी विचारसरणीचे सर्व शिक्षक, भगिनींनी विवेक भैय्या कोल्हे यांना प्रथम पसंतीचे मत द्यावे असे आवाहन शिवाजी शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करत असणारे विवेक कोल्हे यांना मतदार संघातील पाचही जिल्ह्यातील महत्त्वाच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर कोल्हे यांची प्रचार यंत्रणा खेडोपाडी, वाडी वस्तीवर शिक्षकांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी पोहोचली आहे. त्यामुळेच कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुखर झाला आहे.