भारतीय संविधान हे जगातील आदर्श संविधान – विवेक कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श व सर्वोत्तम संविधान असून, हे गौरवशाली संविधान आपल्या देशाची अस्मिता आहे. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये समाजात रुजवणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे व संविधानिक मूल्यांचे आचरण करणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

Mypage

भारतीय संविधान दिना निमित्त रविवारी (२६ नोव्हेंबर) कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील संविधान चौक फाऊंडेशनच्या वतीने साधू, संत, महंत व धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून वाजतगाजत संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे आणि साधू, संत, महंत व धर्मगुरू यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रॅलीचे उद्घाटन झाले. विवेक कोल्हे यांनी रॅलीत सहभागी होऊन भीमसैनिकांचा उत्साह वाढवला. 

tml> Mypage

या रॅलीमध्ये विवेक कोल्हे यांच्यासह प. पू. भिक्खू मिलिंद बोधीथेरो, भिक्खू आनंद सुमनसिरी थेरो, भिक्खू कश्यपजी, भिक्खू थेवाधम्मो, भन्ते धम्मसिरी, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला, मौलाना आसिफ कासमी, मौलाना हमीद राही, बाबाजी हरजितसिंग, फादर प्रमोद बोधक, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माधव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,

Mypage

माजी नगरसेवक अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, संविधान चौक फाऊंडेशनचे संस्थापक नितीन शिंदे, अध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव जितेंद्र साळवे, कार्याध्यक्ष संजय कोपरे व सर्व सदस्य, नानासाहेब जगताप, मेजर मारुती कोपरे, अॅड. गंगावणे, अॅड. नितीन पोळ, रवींद्र रोहमारे, जगदीश मोरे, दादासाहेब नाईकवाडे, जयेश बडवे, बाबासाहेब साळुंके, खालिक कुरेशी, प्रसाद आढाव, सचिन सावंत, विजय चव्हाणके, शफिक सय्यद, जयप्रकाश आव्हाड,

Mypage

सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश चव्हाण, रवींद्र जाधव, प्रशांत अहिरे, सनी वाणी, यश वाणी, अरुण त्रिभुवन, विशाल शिंदे, अक्षय शिंदे, सूरज दुशिंग, मारुती सोनवणे, विजय चव्हाण, किशोर दुशिंग, खिवराज दुशिंग, संजय चव्हाण, चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे, पप्पू बागुल, देविदास तुपसुंदर, गोरख इंगळे, शिवाजी शिंदे, संजय तुपसुंदर, अंकुश जोशी, राजेंद्र कवडे, विक्रांत सोनवणे, प्रभुदास पाखरे, वसंत गायकवाड आदींसह भाजप, भाजयुमो, संविधान चौक फाऊंडेशन, बुद्धिस्ट यंग फोर्ससह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Mypage

रॅलीच्या अग्रभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाची प्रतिमा सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आली होती. तिरंगा ध्वज फडकावत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणा देत निघालेल्या या रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस व अन्य महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेली मुले तसेच विविध खेळ सादर करणाऱ्या मुला-मुलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. संविधान चौक, टिळकनगर येथून निघालेली ही रॅली गांधीनगर रोड, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप झाला.

Mypage

कोपरगाव येथील माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप, भाजयुमो, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.