कोपरगावप्रतिनिधी, दि.२७ : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून, रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळू शकते. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतो तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपण रक्तदान केले पाहिजे. रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सेवाभावी संस्था व संघटनांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
मुंबईत २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवान, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून कोपरगाव येथील मित्र फाऊंडेशन व एच. डी. एफ. सी. बँकेच्या वतीने रविवारी (२६ नोव्हेंबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट देऊन या उपक्रमाबद्दल मित्र फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माधव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे, दिनेश कांबळे, विजय चव्हाणके, प्रसाद आढाव, जगदीश मोरे, जयेश बडवे, खालिक कुरेशी, शफिक सय्यद, दादासाहेब नाईकवाडे, सचिन सावंत, विजय चव्हाणके, बाबासाहेब साळुंके, जयप्रकाश आव्हाड, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश चव्हाण, धुळे येथील जीवन ज्योती ब्लड बँकेचे बाळासाहेब गव्हाणे, समाधान आढाव, वेदांत कुलकर्णी, एच. डी. एफ. सी. बँकेचे मॅनेजर पंकज शिंदे, अमर नरोडे,
मित्र फाऊंडेशनचे पदाधिकारी चंद्रकांत वाघमारे, अभिषेक आढाव, देविदास बागुल, कृष्णा वाणी, सनी शेळके, गणेश रुईकर, नितीन सावंत, आबा नरोडे, हर्षल नरोडे, कुमार बागरेचा, रोहित आढाव, मनील नरोडे, संदीप सावतडकर, राहुल नरोडे, बंटी काकड, सौरभ होते, रामचंद्र साळुंखे, शेखर कोलते, नवनाथ उदावंत, नवनाथ सोमासे, राहुल शिंदे, विशाल आढाव, दर्शन जैन, विकास पवार, साई नरोडे, भूषण नरोडे, शुभम गवारे, प्रशांत आढाव, साकेत नरोडे, आकाश आमले, राकेश आढाव, गोलू पिसे, ऋषिकेश नागरे, किशोर शिंदे, विशाल ठक्कर आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते उपस्थित होते.
युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, अपघात व उपचारप्रसंगी गरजू व्यक्तींना रक्ताची आवश्यकता असते. रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचतात. आपल्या रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळू शकते, म्हणून समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून रक्तदान केले पाहिजे. युवकांमध्ये रक्तदान करण्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मित्र फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम राबविले जातात.
मित्र फाऊंडेशनतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून, त्यांनी आयोजित केलेले हे ४६ वे रक्तदान शिबीर आहे. मित्र फाऊंडेशनने यापुढील काळातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.