आव्हाने बुद्रुकच्या उपसरपंचपदी संगीता कोळगे यांची निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील आव्हाने बुद्रुकच्या उपसरपंचपदी संगीता प्रताप कोळगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.      आव्हाने बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर यांच्या नेतृत्वाखालील मोरेश्वर ग्रामविकास मंडळाने सरपंच पदास सह १२-० आशा मोठ्या फरकाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती. तर उपसरपंच निवडीत संगीता कोळगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

याप्रसंगी सुधाकर चोथे, अजुद्दीन पठाण, अनिता साळकर, रूपाली नांगरे, जयश्री तागड, संतराम दिंडे, प्रियंका कवडे, विनायक कळमकर, आश्विनी खैरे आशा रसाळ, बाळासाहेब कोळगे, वसंत भालेराव, सुभाष दिघे, मच्छिंद्र नांगरे, शिवाजी तळेकर, कैलास लद्दे, साईनाथ झाडे यांची उपस्थिती होती.

निवडणूक निरीक्षक म्हणून मंडलाधिकारी टेकाळे हजर होते. त्यांना ग्रामसेवक अशोक नवले यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार नरेंद्र घुले, मा. आ. चंद्रशेखर घुले, जि. प.च्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, माजी सभापती क्षितिज घुले यांनी अभिनंदन केले.