भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे वरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्यावर भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हे वाळू चोरीचे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या. तसेच ही खोटी पोलीस केस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे भाजपा पदाधिकारी व अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    यावेळी पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ ऑगस्ट २०२३ रोजी व २४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दरम्यान वाळू चोरीस गेल्या बाबत नमूद केले आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी प्रत्यक्ष पंचनामा केला असता वाळूचा साठा जशास तसा आहे  हे स्पष्ट होते. यावरून सदरची तक्रार ही खोटी व राजकीय नेतृत्वाच्या संगनमताने  केलेली आहे हे स्पष्ट होते. असे निवेदनात म्हटले आहे.

         यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड, पाथडींचे माजी सभापती संभाजीराव पालवे, पाथर्डींचे भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, अमोल सागडे, संजय कीर्तने, गुरुनाथ माळवदे, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड, कॉ. संजय नांगरे, रासपचे आत्माराम कुंडकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सतीश मगर, डॉ. कृष्णा देहाडराय, डॉ. नीरज लांडे, विनोद मोहिते, संजय टाकळकर, बाळासाहेब आव्हाड, अशोक गाडे, संजय खेडकर, अर्जुन ढाकणे, बजीर पठाण, युसुफ शेख, अजय भारस्कर, भूषण देशमुख, राहुल भारस्कर, अॅड. श्याम कनगरे, लाडजळगावचे अंबादास ढाकणे, युवराज फुंदे, अमोल कुदे, पप्पू केदार, सर्जेराब जबरे, अशोक जबरे, अण्णासाहेब ढोक, शिवाजी दहिफळे, मल्हारी घुले, माऊली उगले, रवि राशिनकर, अभिजीत घोळवे, तुकाराम थोरवे, तसेच शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.