कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : कोपरगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ.कुंदन गायकवाड व डॉ. संजय गायकवाड यांच्या मातोश्री वेणुबाई किसनराव गायकवाड वय ९६ वर्ष रा. शिर्डी यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. स्व. वेणुबाई गायकवाड ह्यांनी अतिशय कष्टातुन दुष्काळाच्या भिषण काळातही आपल्या मुलांना शिक्षण देवून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. पाच मुलांसह एका मुलीला उच्च शिक्षण देवून आदर्श गृहीणी व आदर्श माता म्हणून कोपरगाव शिर्डी, राहता परिसरात परिचित होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त होत आहे .

त्यांच्या पाश्चात्य मुलगा अशोक गायकवाड, विलास गायकवाड, विश्वास गायकवाड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. कुंदन गायकवाड व मुलगी सुनंदा बनसोडे असे पाच मुले व एक मुलगी तसेच सुना, जावई व अनेक उच्च शिक्षित नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व वेणुबाई गायकवाड यांच्या निधनाची वार्ता कळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, यांनी शोक व्यक्त केले आहे.

दरम्यान स्व. वेणुबाई गायकवाड यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शिर्डी अमरधाम येथे होणार आहे.
