मतदासंघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहील – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : ज्या विश्वासाने मतदार संघाच्या विकासाची दोर मतदार संघातील जनतेने माझ्या हातात सोपविली त्या विश्वासाला पात्र राहून मतदार संघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

Mypage

आ.आशुतोष काळे यांनी मकर संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आपल्या प्रत्येक सणाच्या मागे संस्कृती आहे. प्रत्येक सणाचे निसर्गाशी नाते असून निसर्गच आपल्याला या सणांच्या निमित्ताने एकत्र आणतो. त्यामुळे आजही हे सण व उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. अशाच महत्वपूर्ण सणांपैकी एक सण असलेला मकर संक्रांतीचा सण. या सणाला लहानपणी मित्रांसोबत अनेक वेळा पतंग उडवण्याचा आनंद घेतला. परंतु प्रत्येकाचे वय वाढले की जबाबदाऱ्या देखील वाढत असतात.

Mypage

त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतांना आपण आपले छंद, खेळ यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी कार्यकर्त्यांना समवेत पतंग उडवतांना मनाला वेगळाच आनंद मिळाला. वय आणि जबाबदाऱ्या जरी वाढल्या तरी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून प्रत्येकानेच असा खेळाचा आनंद दरवर्षी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. 

Mypage

यानिमित्ताने माझ्या प्रयत्नांचा मांजा एकदम पक्का आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाची दोर माझ्या हाती सुरक्षित राहणार आहे आणि कोपरगावच्या विकासाचा पतंगही असाच सातत्याने आकाशात उंच भरारी घेत राहील. येणाऱ्या काळात हा विकासाचा पतंग अजून उंचावर नेऊन कोपरगाव मतदार संघाचा कायापालट होणार असल्याची आ.आशुतोष काळे यांनी ठामपणे ग्वाही देवून कार्यकर्त्यांसह मतदार संघातील नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

Mypage