श्री गणेश शैक्षणिक संकुलाची राज्यस्तरावर मजल

कोपरागाव प्रतिनिधी, दि.०७ : शालेय क्रीडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रिंग टेनिस या खेळामध्ये श्री गणेश शिक्षण संस्थेच्या उत्कर्षा उकिर्डे या विद्यार्थिनीने आपल्या खेळाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. तिची १९ वर्षे वयोगटात रिंग टेनिसमध्ये राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झालेली आहे.

पुणे विभागाकडून एकूण तीन खेळाडूंची राज्यासाठी निवड करण्यात आलेली असून निवड चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर हे खेळाडू राज्याचे नेतृत्व करणार आहेत. श्री गणेश शैक्षणिक संकुलात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा यांची तयारी करून घेतली जाते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली.

उत्कर्षाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, महावीर शिंगवी, देविदास दळवी, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, उपप्राचार्य प्रवीण दहे, प्रा.सागर हिंगे, प्रा.योगेश फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी तिचे अभिनंदन केले. या खेळाडूला क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.