गाळमिश्रीत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे सुभद्रानगरच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात

 कोपरगाव प्रतिनिधी दि.१५ : कोपरगाव शहरातील नागरीकांची पाण्यावाचुन होणारी हाल ही काही नवीन बाब राहीली नाही. पाचवीला पुजलेल्या दुष्काळग्रस्त भागातील नागरीकांना आता नियमीत पिण्याचे पाणी मिळू लागले पण गावाच्या मधून नदी वाहते, पण कोपरगावच्या नागरीकांना वर्षानुवर्षे आठ दिवसाड पिण्यासाठी जे पाणी मिळते तेही पिण्याच्या लायक नसते अशातच शहरातील सुभद्रानगर भागातील नागरीकांना मैलामिश्रीत दुर्गंधीयुक्त दुषित पाणी पुरवठा करुन पालीका प्रशासनाने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नगरसेवक दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे पालीका प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही त्या भागातील पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संतापलेल्या नागरीकांनी गुरूवारी सकाळी पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात दुषित पाण्याच्या बाटल्या देत पालीका प्रशासनाचे दक्ष वेधले.

नागरीकांनी यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता ऋतुजा पाटील यांच्यापुढे अनेक व्यथा मांडून आम्हाला त्वरीत स्वच्छ पाणी पुरवठा करावा. अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पिवून आमचे व आमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे असा आक्रोश नागरीकांनी व्यक्त केला. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी संबधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून या भागातील नागरीकांसाठी स्वतंत्र नविन जलवाहीनी त्वरीत टाकुण स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली. जर पालीका प्रशासनाने  वेळेत स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर यापुढे तीव्र स्वरुपाचे अंदोलन करणार असल्याचा इशारा जनार्दन कदम यांनी पालीका प्रशासनाला दिला आहे. 

 दरम्यान यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता ऋतुजा पाटील यांनी याविषयी बोलताना म्हणाल्या की, या भागातील कोणाचे तरी नळाचे कनेक्शन गटारीच्या जवळ लिक झाल्यामुळे मुख्य जलवाहिनी मध्ये पाणी खेचले जात असावे त्यामुळे या भागातील बहुतांश नागरीकांना दुर्गंधीयुक्त पाणी नळाला जात असावे. लवकरात लवकर या भागातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आम्ही करीत आहोत. काही तांञिक आडचणीमुळे  दुषित पाणी पुरवठा होत असला तरी तो बंद करण्यासाठी पालीकेची यंञणा कार्य करीत आहे असेही त्या म्हणाल्या. 

 कोपरगाव पालीकेच्या गडूळ पाण्याची वर्षानुवर्षे फक्त  चर्चा  होते पण प्रत्यक्षात स्वच्छ पाणी कधीच मिळत नाही. अखेर नागरीकांनी वैतागुन नळाचे पाणी पिण्याचे सोडून दिले. तर काही नागरीकांनी हे कोपरगाव शहरच पाण्यामुळे सोडून गेले आणि दुसऱ्या शहरात स्थिर झाले. देशातलं एकमेव गाव अर्थात कोपरगाव येथे फक्त पाण्यावर चर्चा होते, राजकारण होतं पण प्रत्यक्ष नळाला दररोज पाणी येत नाही.