डॉ. रमेश जारे यांची टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या कॅम्पस उपसंचालकपदी नियुक्ती 

कोपरगावच्या सुपुञाची सामाजिक कार्यात गगनभरारी

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १५ : कोपरगावचे सुपुत्र प्रोफेसर डॉ. रमेश जारे यांनी दुष्काळी भाग असलेल्या तुळजापूर तालुक्यात जावून आपल्या सामाजीक कार्यकर्तृत्वाच्या जोराव अनेक समाजोपयोगी कार्य करुन नवी दिशा दिल्याने त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या कॅम्पस उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतामध्ये सन १९३६ ला व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाचा प्रारंभ टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई या संस्थेने केला.  त्यानंतर संपूर्ण देशामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा एक वेगळा नावलौकिक आहे.  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई द्वारा तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे सन १९९८ साली रुरल कॅम्पस कार्यान्वित करण्यात आला आहे.  या रुरल कॅम्पसच्या उपसंचालक पदी येथील ज्येष्ठ प्रोफेसर  व कोपरगाव जिल्हा अहमदनगरचे सुपुत्र डॉ. रमेश जारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रोफेसर डॉ.रमेश जारे हे सन १९८९ मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पसमध्ये क्षेत्रकार्य व संशोधनकार्य प्रकल्पामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्कळी व दुर्लक्षित विविध गावांमध्ये व खेड्या पाड्यातील वाड्या वस्त्यावर जावून त्या भागातील पिण्याच्याहपाणीची व सिंचनाच्या पाण्या संदर्भातत मोठे कार्य केले. केवळ पाणीच नाही तर या भागातील जिरायत शेतीला बागायत शेती करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

ग्रामीण व  दुष्काळग्रस्त भागातील महिलांना  सक्षमीकरण, भूकंपाताने उध्वस्त झालेल्या कुटुंबाचे पुर्नवसनाचे कार्य, वडगांव लाख येथील आदर्श पाणलोट क्षेत्र प्रकल्पाचे कार्य, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण डॉ. जारे यांचे कार्य अनेकांना दिशादर्शक ठरले. पंचायतीराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जारे यांनी विशेष प्रयत्न केले.

सामाजिक संस्थेच्या  माध्यमातून दलित, वंचित, दुर्लक्षित घटकांना त्यांचे मुलभूत हक्क व अधिकार मिळावे व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी डॉ. जारे यांचे  आजही प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पंचायतीराज व्यवस्था या विषयावरच पीएच.डी.केली आहे. अपार मेहनत घेवून शुन्यातून आपली ओळख निर्माण करणारे आदर्शवत व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात आदराने घेतले जाते. 

संस्थेच्या स्थापनेपासुन आजतागायत त्यांनी सामाजिक कार्यकर्ता, विविध प्रकल्पांवर प्रकल्प समन्वयक, लेखक, संशोधक, बी.ए.इन सोशल वर्क अभ्यासक्रम तयार करणारे अभ्यासक, शैक्षिणक निती धोरण तयार करणारे नितीतज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उपकुलसचिव, प्रोफेसर,  अधिष्ठाता, विविध शासकीय, अशासकीय समिती प्रमुख, सदस्य अशा विविध पदांवर नेञदिपक कार्य केले आहे.  डॉ. जारे यांच्या  आजवरच्या विविध कार्याचा अनुभव हा  संस्थेच्या प्रगतीसाठी  व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थ भावनेतून केलेले कार्य  म्हणजे त्याग आणि समर्पण आहे म्हणुनच डॉ. जारे यांचा  हा सन्मान  टाटा संस्थेने उपसंचालक पदाची जबाबदारी देवून केला आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर कॅम्पसच्या उपसंचालकपदी त्यांच्या झालेल्या नियुक्ती बद्द्ल टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनिक विभाग, अधिकारी, कर्मचारी त्याच बरोबर देशभरातील विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील मान्यवरांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत.