कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : सहकारी बँकेत अग्रगण्य असलेल्या व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद रावसाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी जयंतीलाल मेघजी पटेल यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
शरद थोरात यांच्या नावाची सुचना संचालक नानासाहेब आनंद गव्हाणे यांनी केली, तर रामदास पुंजा देवकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी जयंतीलाल पटेल यांच्या नावाची सुचना बाळासाहेब कचेश्वर निकोले यांनी केली, तर त्यास दिलीप शिवराम बनकर यांनी अनुमोदन दिले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली साई संजीवनी बँकेची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली.
बिपीन कोल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार करण्यांत आला. ते पुढे म्हणाले की, मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सहकारासमोर अनेक नव नविन आव्हाने निर्माण झाली असुन साई संजीवनी बँक त्यात यशस्वीपणे काम करत आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाला बळ देत सहकारी बँकांचे जाळे निर्माण केले. साई संजीवनी बँकेकडे सुमारे शंभर कोटी रूपयांच्या ठेवी असुन ७५ कोटी रूपयांचे कर्जवाटप केले आहे, थकबाकीचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बँकेला राज्य स्तरावर अनेक नामांकित पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष शरद थोरात सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. उपाध्यक्ष जयंतीलाल पटेल म्हणाले की, आपल्या निवडीचा विश्वास सार्थ ठरवु.
याप्रसंगी संचालक नारायण अग्रवाल, सुरेश जाधव, माधव विठठलपुरी गोसावी, कचेश्वर माळी, प्रियांका कल्याण दहे, विमल सोपान चिने, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, माजी उपाध्यक्ष अरूण येवले, शिवाजी वक्ते, संचालक त्रंबक सरोदे, विश्वास महाले, आप्पासाहेब दवगे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, निवृत्ती कोळपे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे आदि विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र रहाणे व मुख्य सरव्यवस्थापक पदमाकर सभारंजक यांनी सहकार्य करून उपस्थितांचे आभार मानले.