पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावाना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योग्य नियोजन करून मिळालेल्या अतिरिक्त १.५ टीएमसी पाण्यातून मतदार संघ व निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्वच पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.

Mypage

आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावाना अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून मतदार संघाच्या लाभ क्षेत्रातील सर्व पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव व लघु बंधारे यांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करण्याबाबत योग्य नियोजन व्हावे. यासाठी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित पाटबंधारे विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Mypage

पाटबंधारे विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ. आशुतोष काळे.

यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावे मागील अनेक दशकांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत होती. कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या गावातील नागरिकांना निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. या गावातील सर्व पाझर तलाव व लघु बंधारे भरून देण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून व निळवंडे धरणातून जास्तीत जास्त पाणी या गावातील नागरिकांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला.

Mypage

त्या पाठपुराव्याची दखल घेवून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावाना सर्व बंधारे भरून देण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत. त्यासाठी पाटबंधारे विभागासह प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पोलीस प्रशासनाने देखील गावागावात अंतर्गत वाद होणार नाही. यासाठी खबरदारी घेवून सर्व पाझर तलाव व लघु बंधारे भरून देण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या.

Mypage

या बैठकीसाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, निळवंडे कालव्याचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड, उपअभियंता दळवी, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसाठ आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *