ठाकूर निमगाव सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी जिजाभाऊ निजवे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील ठाकुर निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत जिजाभाऊ एकनाथ निजवे यांची शुक्रवारी  बिनविरोध निवड करण्यात आली.  रिक्त झालेल्या  पदाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत जिजाभाऊ निजवे यांचा एकमेव  नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर ज्येष्ठ संचालक दादासाहेब लक्ष्मण निजवे यांनी सूचक  तर शंकर मोहन हुंबे यांनी अनुमोदन दिले.

एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध आल्याचे घोषित करण्यात आले त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  निवडणूक अधिकारी व सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. निजवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याप्रगी संभाजी कातकडे, मच्छिंद्र कातकडे, दादासाहेब निजवे, साईनाथ निजवे, रामनाथ फरताळे, पंढरीनाथ कातकडे, दिलीप घनवट, नारायण निजवे, शंकर हु़ंबे, आलका निजवे, यशोदा कातकडे, आबासाहेब कातकडे, विठ्ठल निजवे, रामेश्वर निजवे, अशोक चव्हाण उपस्थित होते. 

Leave a Reply