सोमैया महाविद्यालयात ज्योतिबा फुले यांना अभिवादन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ते एक विचारवंत व लेखक होते, त्यांनी आपले संपूर्ण जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले होते. म्हणूनच त्यांना महात्मा ही उपाधी देउन गौरविण्यात आले.

त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने पुण्यात मुलींसाठी शाळा उघडली जे भारतातील महिला शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरले. शिक्षणासह त्यांनी अनेक सामाजिक कार्यही केली. शिक्षण, समता आणि सामाजिक जागृती करून लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती असल्याने या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, प्रो. संतोष पगारे, डॉ. बाबासाहेब गव्हाणे, डॉ. शैलेंद्र बनसोडे, प्रा. सदाशिव नागरे, डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. निता शिंदे, प्रा. वर्षा आहेर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.

Leave a Reply