कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : शालेय जीवनात मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यातही आगाऊ आरक्षण करून रेल्वेने प्रवास करण्याची मौजही बालवयात वेगळीच असते. उत्साह, मस्ती आणि खुप खुप आनंद अविस्मरणीय क्षणांची पर्वणीच ठरते. अशाच प्रसंगांचा अनुभव संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राजस्थान सहलीच्या दरम्यान अनुभवला.
संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांच्या कल्पकेतुन प्रत्येक वर्षी शाळेतील मुलांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येते. मागील दोन आडीच वर्षांपासून कोविड १९ च्या प्रकोपामुळे मुलांना सहलीचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे चालु वर्षी विध्यार्थ्यांमधे सहलीचा उत्साह कमालीचा ठासुन भरला होता. यावेळी इ. ४ थी ते इ.८ वीच्या विध्यार्थ्यांसाठी राज्यस्थान राज्यातील ऐतिहासिक व पौराणिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक गड किल्यांची माहिती अभ्यासली असते परंतु प्रत्यक्ष सहलीच्या मिमित्ताने भेटी देण्याचा अनुभव घेवुन तेथिल इतिहास जाणुन घेण्याची संधी विध्यार्थ्यांना मिळाली.
एकुण ७ दिवसांच्या सहलीत पहिला दिवस प्रवासातच गेला. दुसऱ्या दिवशी प्रथम जयपुर येथिल जलमहल, अमर फोर्ट, शीतला माता मंदीर या प्रेक्षणिय स्थळाना भेटी दिल्या. तिसऱ्या दिवशी जयपुर ते बिकानेर प्रवास करत बिकानेर मधिल सिटी पॅलेस, जंतरमंतर येथिल १२ राशी यंत्र, सौरमंडल ग्रह, खगोलिय माहिती, दिशा यंत्र, सम्राट यंत्र, ध्रुवदर्शक पट्टीनाडी यंत्र, चक्रयंत्र, राजयंत्र, कुंडलीयंत्र, घड्याळ यंत्र यातिल गणित ज्ञान, अशी खगोलीय वेध शाळेची माहिती सोबत हवा महल या स्थळांना भेटी दिल्या.
चौथ्या दिवशी बिकानेर ते जैसलमेर प्रवास करत जैसलमेर या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला, जुनागड, सम येथे उंट सफारी, प्रसिध्द असणारे करणी माता दर्शन घेवुन पाचव्या दिवशी जैसलमेर मधिल प्रसिध्द असणारी नतमललालजी हवेली, पाठोनकी हवेली, अमरसागर लेक, गडीसिसर लेक, गोल्डन फोर्ट बघुन मुलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सहाव्या दिवशी मुलांनी जैसलमेर ते जोधपुर प्रवास केला. जोधपुर येथिल मेहरगड फोर्ट, उमेदभवन पॅलेस, या प्रेक्षणिय स्थळांना भेटी दिल्या. सातव्या दिवशी मुलांनी जोधपुर ते मुंबई परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी मुलांनी प्रत्येक ठिकाणी भरपुर फोटो काढले. सर्व प्रेक्षणिय स्थळांची डायरीमध्ये नोंद केली. प्रत्येक ठिकाणच्या प्रसिध्द असणाऱ्या खुप सर्व वस्तु खरेदी केल्या.
या सहली दरम्यान मुलांना वस्तु खरेदी करताना वस्तुंची किंमत कशी करावी, हे व्यवहारीक ज्ञान प्राप्त केले. संघभावना, शिस्तप्रियता, सहकार्याची वृत्ती, स्वावलंबन, नेतृत्वगुण, इतर राज्यातील चालीरीती, त्या त्या राज्याची विशिष्टे, भौगोलिक माहिती, शेती प्रकार, प्राणी, पक्षी, लोकजीवन, नद्या, झाडी, उद्याने, नैसर्गिक ज्ञान, किल्ले, राजे महाराजे यांची माहिती प्राप्त केली.
एवढ्या दुरचा प्रवास करत असताना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डाॅ. मनाली कोल्हे वेळोवेळी मुलांना मोबाईल काॅल करून माहिती विचारत काळजी घेत होते. मुलांचा प्रवास सुरू होताना सर्वांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. सर्व मुलं व्यवस्थित घरी आल्यावर व्यवस्थापन समितीने सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी पालकांनी देखिल व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले. मुलांसोबत सहली दरम्यान प्रिन्सिपल डायरेक्टर सौ. सुंदरी सुब्रमण्यम आणि कौठाळे सर होते. असा सहलीचा मनमुराद आनंद मुलांनी घेतला.