कोपरगाव शहरात एकाच दिवशी तिन ठिकाणी घरफोडी

 दाट लोकवस्तीत चोरांनी घरफोड्या केल्याने चोरांची दहशत वाढली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६: कोपरगाव शहरातील निवारा, ओमनगर सुभद्रानगर भागात बुधवारी पहाटे एका चोरट्याच्या टोळीने चार ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यात ओमनगर येथील मधुकर लक्ष्मण कांबळे यांच्या घराला कुलुप असल्याचे पाहुन पहाटेच्या दरम्यान घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी त्यांच्या कपाटातील तीन तोळे सोन्याचे दोन गंठन एक नथनी असा अंदाचे ६६ हजाराचा ऐवज चोरला.

तर जानकी विश्व येथील रोहीत पटेल यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून त्याच मोटारसायकलवरून निवारा येथील  द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांचे घर फोडुन चांदीचे नाणी व काही रोकड असा अंदाजे दहा हजाराचा ऐवज लुटला. याच भागातील यशवंत आंबेडकर यांचे घर फोडले माञ त्यात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

दरम्यान पहाटे सहाच्या दरम्यान द्वारकानाथ मुंदडा हे घराला कडी लावून फिरायला गेले. फिरुन पुन्हा घराजवळ आले असता तीन चोरटे मोटारसायकलवरून त्यांच्या जवळून निघून गेल्याची माहीती त्यांनी स्थानिक नागरीकांना दिली परंतु मुंदडा यांनी पोलीसांकडे तक्रार केली नाही.

 दरम्यान मधुकर लक्ष्मण कांबळे हे आपल्या वैयक्तिक कामानामित्त्याने गुजरातला परिवारासह गेल्याचे, जावई ज्ञानेश्वर आंबादास शिंदे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट देवून ठसे तज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे हे करीत आहेत.  चोरट्यांची दहशत वाढल्याने  नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.