कऱ्हेटाकळीच्या निकृष्ठ कामांची चौकशी करा, कार्यकर्त्याची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६: तालुक्यातील क-हेटाकळी ग्रामपंचायतीने जन्सुविधा योजने अंतर्गत करण्यात आलेला  सिमेंट रस्ता व स्मशानभूमी सुशोभीकरण ही दोन कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून या कामांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायके यांनी गटविकास अधिका-यांकडे  दिलेल्या  एका निवेदनाद्वारे केली आहे.

Mypage

      सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यात सिमेंट व क्रश कमी प्रमाणात वापरल्यामुळे हा रस्ता काही दिवसातच पूर्णपणे उखडला आहे.या कामासाठी ९ लाख ७५ हजार रुपये खर्च झाल्याचे  समजते . मात्र हे काम अत्यंत खराब झाले आहे. स्मशानभूमी सुशोभीकरण कामासाठीही पावणे दहा लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवले आहे. परंतु हे कामही अत्यंत दर्जाहीन झाले आहे त्यामुळे या दोन्ही कामांची समक्ष पाहणी करून संबधितांवर कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गायके यांच्यासह अविनाश पिटे,संदीप कणसे,सतीश गायके,सचिन म्हस्के,पांडुरंग चितळे,शंकर गटकळ,गणेश काटे,बाबासाहेब काटे यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 

Mypage