दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचा केला निषेध

शेेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या फसव्या दूध दरवाढी विरुद्ध रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला. दूध उत्पादकाच्या रस्ता रोकोला प्रशासनाने परवानगी नाकारून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही निषेधार्थ दूध उत्पादकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत सरकारचा निषेध केला.

ग्रामीण भागात दुध व्यावसाय हा शेतकऱ्यांचा जोड धंदा असून दैनंदिन गरजा भागवतांना दुधाचा मोठा आधार होत असतो. सरकारने दुधाला ३४ रुपये प्रति लिटर दर जाहीर केला. परंतु एस.एन.एफ व फॅटच्या जाचक अटी लावल्यामुळे दूध उत्पादकांना अवघा २३/२४ रुपये प्रति लिटर दर मिळत असल्याने दुध उत्पादकांचा आर्थिक तोटा होत आहे. सरकारने असे करून दूध उत्पादकांची चेष्टाच केली आहे. असे प्रतिपादन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांना दुधासाठी सुमारे पंचवीस रुपये प्रतिलिटर खर्च येतो. सध्या दुधाला मिळणारे दर न परवडणारे आहेत. पूर्वी दुधाला एस.एन.एफ व फॅटला २० ते २५ पैसे कटिंग होत होती. परंतू आत्ता प्रत्येक पाॅईटला एक रुपया कापला जात आहे. त्यामुळे दुध व्यवसाय पूर्णपणे  उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

दुध उत्पादक बाळासाहेब काळे म्हणाले, पशु खाद्याचे दर सुद्धा अवाढव्य आहेत. त्यामुळे दूध धंद्यात होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा  ताळमेळ बसत नाही. या आंदोलन प्रसंगी राहुल बेडके, राजेंद्र आढाव, राजेंद्र फटांगरे, शंकर नारळकर, शामराव सावंत, जालिंदर आहेर, डॉक्टर सय्यद, योगेश मेरड, सचिन मेरड, संतोष गांडुळे, जालिंदर समृत आदीसह दुध उत्पादक उपस्थित होते. 

ReplyReply allForward