आमदार कोल्हे यांच्या काळात मतदारसंघाचा खरा विकास झाला – वाल्मीक भोकरे 

कासली (शिरसगाव) येथे ‘टिफिन पे चर्चा’ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद  

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला पाणी, वीज, रस्ते, पाटपाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून देत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. कष्टकरी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. स्नेहलताताई कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास झाला, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते वाल्मीकराव भोकरे यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मोदी 9 जनसंपर्क अभियानांतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कासली (शिरसगाव) येथे रविवारी (१६ जुलै) शिवाजीराव जाधव यांच्या वस्तीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ‘टिफिन पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत राबविलेल्या विविध विकास योजनांची माहिती देऊन भाजप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच पक्ष बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.

स्नेहलताई कोल्हे म्हणाल्या, नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने शत्रू राष्ट्राला धडकी भरविणारे सक्षम, कणखर व दूरदर्शी पंतप्रधान आपल्या देशाला लाभले असून, त्यांनी आपल्या कर्तबगारीने भारताचा जगात नावलौकिक वाढवून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठी प्रगती केली असून, आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करणारे पंतप्रधान मोदी हे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून त्यांच्यापर्यंत विविध विकास योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. सेवा, सुशासन व गरीब कल्याण यावर भर देत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करत त्यांनी जनतेच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत १२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ९.६ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन, जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेदवारे घरोघरी पाणी, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत ३.०३ कोटी महिलांना मदत, मुद्रा योजनेअंतर्गत २७.६ कोटी महिला लाभार्थांना कर्ज वाटप, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १०.७ कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण व ४.५ कोटी

नागरिकांना मोफत उपचार, रस्ते, पाणी, वैद्यकीय, शिक्षणाच्या पायाभूत सुविधा, बेरोजगारांना रोजगार, महामार्ग व विमानतळांचा विकास अशी अनेक लोककल्याणकारी कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात काशी विश्वनाथ कॉरिडॉर विकसित झाले आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर, काशी विश्वनाथ व उज्जैन येथील महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम, सोमनाथ व केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे मोठे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कुशल व समर्थ नेतृत्वाखाली आपला देश सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. नऊ वर्षांत त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. जगातील अनेक देश आज आर्थिक संकटात असताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग, ज्ञान, विज्ञान, पर्यावरण, अध्यात्म, वसुधैव कुटुंबकम आणि विश्वकल्याणाचा संदेश जगाला दिला आहे. अमेरिका, इंग्लंडसह जगातील १५० देशांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ‘देश प्रथम, नंतर पक्ष’ असा विचार घेऊन समर्पणाच्या भावनेतून जनतेच्या व देशाच्या हितासाठी काम करणारा भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.

देशातील जनता हाच आपला परिवार आहे, असे समजून अहोरात्र काम करणारे पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाचे वैभव असून, ते आपण सर्वांनी जपले पाहिजे. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी देशात यापुढेही मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर असणे काळाची गरज असून, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन स्नेहलताई कोल्हे यांनी केले.

तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविकात पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, प्रकाश शिंदे, सुदामराव कर्पे, शिवाजीराव जाधव, गोविंदराव मलिक, अंबादास पाटोळे, अशोकराव शिंदे, संजय पठाडे, किसनराव गव्हाळे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश भिंगारे, दत्तात्रय मलिक, बाबासाहेब भिंगारे, मनोज तुपे, दत्तात्रय हेगडमल, विष्णू बोळीज, शिवाजी गायकवाड, अंकुश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, बबन गायकवाड, रवींद्र गायकवाड, रविकांत भवर, रोहित मढवे,

ऋषिकेश जाधव, सीताराम गोरे, कैलास जामदार, बाळासाहेब भिंगारे, केशव गायकवाड, ज्ञानदेव गायके, दत्तात्रय पाटोळे, हरिभाऊ गव्हाळे, अशोक पठाडे, सुदाम गायकवाड, बबन साळुंके, नवनाथ मरकड, अरविंद लंके, अभिजित बोडखे, रतन मलिक, हर्षदाताई जाधव, जयश्रीताई मढवे, पुष्पाताई बोजगे, शीतल गायकवाड, ज्योती महाले, वंदना मच्छिंद्र जाधव, वंदना गोकुळ जाधव, निर्मला शिवाजी जाधव यादीसह सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच कासली, शिरसगाव, संवत्सर, दहेगाव (बोलका), पढेगाव व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी वाल्मीकराव भोकरे, शिवाजीराव जाधव व इतर कार्यकर्त्यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते, पाणी, आरोग्य व विकासाचे अनेक प्रश्न सोडविल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी खासदार सूर्यभान पाटील वहाडणे, विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे, माजी खासदार भीमराव बडदे यांच्यानंतर माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घरोघरी भाजपचे ‘कमळ’ हे चिन्ह पोहोचवून भाजप वाढविण्याचे मोठे काम केले आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासात कोल्हे कुटुंबाचे मोठे योगदान असून, मतदारसंघातील जनता कोल्हे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी सांगितले.