शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकान्त बावनकुळे यांनी नुकतीच भाजपाच्या तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. त्यात अहमदनगर दक्षिणचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपाचे जूने ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीपजी भालसिंग यांची नियुक्ती जाहीर झाली. त्यानंतर भालसिंग यांनी सर्वप्रथम शेवगावला भेट दिली असता स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ठीक ठिकाणी तोफा, फटाके उडवत उत्स्फूर्त स्वागत केले.
श्री संत गाडगेबाबा चौक, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे चौकात तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संपर्क कार्यालयात फटाक्याची आतषबाजी करत त्यांचे शेवगाव शहरात भारतीय जनता पार्टी शेवगाव व तालुक्याचे वतीने स्वागत करण्यात येऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आमदार राजळे पावसाळी अधिवेशनासाठी मुबईला असल्याने त्यांनी देखील तेथून भ्रमण ध्वनीद्वारे भालसिंग यांचेसी संपर्क साधून त्याना शुभेच्छा दिल्या. त्यांनंतर भालसिंग यांनी माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. तेथेही मुंढे व भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील उर्फ बंडूशेठ रासने, बापू पाटेकर, बाळासाहेब महाडिक, माजी नगरसेवक महेश फलके, सुभाष बडधे, संभा काटे, राजेंद्र डमाळे, प्रा नितीन मालानी, मुसाभाई शेख, कैलास सोनवणे, आनंदा उकिरडे, बाप्पू धनवडे, दिलीप सुपारे, मच्छिंद्र बर्वे, अमोल माने, किरण काथवटे, शरद चाबुकस्वार, बाळासाहेब झिरपे यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या संकल्पनेतील भारत निर्मितीसाठी भाजप अधिक मजबूत करायचा आहे. त्यासाठी आपण सर्व जोमाने कामाला लागू या.
दिलिपजी भालसिग
भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष
( अहमदनगर दक्षिण )