कोपरगावकरांचे २० कोटी वाचले, नागरिकांनी आमदार काळेंचे मानले आभार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिला असून हा निधी मिळविण्यासाठी लोकवर्गणीची १५ टक्के रक्कम देखील शासनाकडून मिळविली आहे. त्यामुळे कोपरगावकरांचे जवळपास २० कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना पेढे भरवत आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित व अशक्यप्राय असलेला कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे वचन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचा जेवढा निधी वाचविता येईल तेवढा निधी वाचवून ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले. त्यावेळी विरोधकांना स्वप्नात देखील वाटले नव्हते की, साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जाईल. मात्र, विरोधकांना तोंडात बोटे घालायला लावून आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी निधी आणला व प्रत्यक्षात काम देखील सुरु आहे.  

परंतु हा १३१.२४ कोटी निधी मिळविण्यासाठी एकूण निधीच्या १५ टक्के लोकवर्गणी जवळपास २० कोटी रुपये कोपरगाव नगरपरिषदेला राज्य शासनाला भरावे लागणार होते. हि रक्कम अर्थातच कोपरगावकरांच्या कराच्या माध्यमातून जाणार होती. त्यावेळी विरोधकांनी देखील एवढी मोठी रक्कम कोपरगाव नगरपरिषद भरू शकत नसल्यामुळे ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होवूच शकत नाही असा अपप्रचार सुरु करून कोपरगाव शहराच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. मात्र, ५ नंबर साठवण तलाव तर करायचाच व नागरिकांवर बोजा पडू द्यायचा नाही.

यासाठी हि १५ टक्के रक्कम राज्य शासनाकडून कशी मिळविता येईल यासाठी आ. आशुतोष काळे यांचा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार आहे, तसेच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्रीना अजित पवार यांच्याकडे अविरतपणे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून १५ टक्के लोकवर्गणीची योजनेची रक्कम १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार रुपये कोपरगाव नगरपरिषदेला मंजूर केली आहे.

एवढी मोठी रक्कम कोपरगाव नगरपरिषदेची वाचल्यामुळे ५ साठवण तलावाच्या कामाला प्रचंड वेग येणार आहे. हा एकत्रित आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. नागरिकांनी देखील या आनंद उत्सवात सहभागी होवून आपला आनंद व्यक्त केला.

 यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, राजेंद्र खैरनार, 

धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, ऋषिकेश खैरनार, विक्रम मांढरे, शुभम लासुरे, इम्तियाज अत्तार, मनोज नरोडे, शैलेश साबळे, एकनाथ गंगूले, गणेश बोरुडे, रहेमान कुरेशी, नारायण लांडगे, सागर लकारे, बाळासाहेब शिंदे, महेश उदावंत, योगेश नरोडे, राजेंद्र जोशी, नितीन शिंदे, दिनेश पवार, राजेंद्र आभाळे, विकी जोशी, दिनेश संत, रोशन शेजवळ, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी, शिवाजी कुऱ्हाडे, विलास पाटोळे,  संतोष शेजवळ, कैलास मंजुळ, रविंद्र राऊत, चंद्रकांत धोत्रे, संतोष दळवी, सागर कापडे, संदीप सावतडकर, आशुतोष देशमुख, हर्षल जैस्वाल, चांदभाई पठाण, संदीप देवळालीकर, नितीन शेलार, बाळाजी देवकर, भोला शेख, सोमनाथ शिंदे, सागर कानडे, साजिद पेंटर, युसूफ शेख, इमरान बागवान, जुनेद शेख, अभिषेक कोकाटे, अमोल देवकर, शकील शेख, संजय राऊत आदी उपस्थित होते.