राज्यातली देतील ती जबाबदारी पार पाडणार – आशुतोष  काळे

 मताधिक्य वाढले तर जबाबदारीही वाढली

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना विक्रमी मतांनी  मतदारांनी निवडून दिल्याने काळे यांची राज्यासह मतदार संघाची जबाबदारी वाढली आहे. जसे मताधिक्य वाढले तसे मतदार संघासाठी वाढीव निधी आणुन वाढिव विकास करणार आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जर राज्यातील कोणतीही जबाबदारी माझ्यावर दिली तरी ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे मत दुसऱ्यांदा  विजयी झालेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

पञकारांशी संवाद साधताना काळे म्हणाले की, मी गेल्या पाच वर्षांत मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबविल्याने लाडक्या बहीणींनी भरभरून  मतदान मला केले. सोबतच  भाजपचे कार्यकर्त्यांसह कोल्हे परिवाराचे मोठे योगदान आहे.त्यांचा चांगला पाठिंबा  मिळाला.

महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, गोदावरी दूध संघाचे राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेनेचे नितीन औताडे, शिवसेनेचे व आरपीआयसह इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेवून माझ्या विजयाचा विक्रम केला आहे. मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी पुढच्या काळात अधिक वाढली आहे. मला विक्रमी मताने निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे आमदार काळे यांनी ऋण व्यक्त करीत आभार मानले.

 आमदार काळे यांच्या विक्रमी मताधिक्यामुळे कोपरगाव मतदार संघाला आता वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द पाळला तर मतदार संघाला दोन लोकप्रतिनीधी आणि मंञी पद मिळण्याची आशा वाढली आहे.  काळे कोल्हे यांना वरिष्ठ नेते राज्याची कोणती जबाबदारी देतात यांची उत्सुकता वाढली आहे.