कोपरगाव मतदार संघात काळे-कोल्हेंच्या जादूने रचला इतिहास
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळेंनी ऐतिहासिक विजय मिळवत सव्वा लाखाचे मताधिक्य घेत राज्यात नवा विक्रम केला आहे.
कोपरगाव विधानसभा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. आमदार काळे यांच्या विजयाची खाञी होती. परंतु काय नवा विक्रम करतात याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासुन प्रत्येक फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट अर्थात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी आघाडी घेत तब्बल १ लाख ६१ हजार १४७ मते घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांचा दारुन पराभव करीत काळे यांनी मतांची आघाडी घेत राज्यात नवा विक्रम केला आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या विजयाने मतदार संघात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत आता फक्त आमदार नाही तर आशुतोष काळे नामदार झाल्याचा आनंद व्यक्त करीत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथे प्रचार सभेत बोलले होते की, आशुतोष काळेंना ८४ हजारांच्या मताधिक्याने विजयी करा मी त्यांना राज्याची मोठी जबाबदारी देतो असे बोलले त्या शब्दाला जागत कोपरगावच्या मतदारांनी थेट सव्वा लाखाचे मताधिक्य दिले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरु झाली मतमोजणीच्या एकुण २० फेऱ्या होत्या सुरुवातीपासून प्रत्येक फेरीमध्ये काळे यांना विक्रमी मताधिक्य मिळत गेले शेवटच्या फेरी अखेर आमदार आशुतोष काळे यांना एकुण १ लाख ६१ हजार १४७ मते मिळाली तर संदीप वर्पे यांना ३६हजार ५२३ मते मिळाली त्यात आशुतोष काळेंनी तब्बल १ लाख २४ हजार ६२४ मताधिक्याने विजय मिळवत कोपरगावसह राज्यात नवा विक्रम केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १२ उमेदवारांना पडलेले मते पुढील प्रमाणे – १ ) आशुतोष काळे – महायुती (घड्याळ)१ लाख ६१ हजार १४७ मते मिळाली, २) संदीप वर्पे – महविकास आघाडी ( तुतारी) ३६ हजार ५२४मते मिळाली, ३) शिवाजी कवडे – ३ हजार ६४० (पिपाणी), ४) संजय काळे – १ हजार १८८ मते (अपक्ष) ५) मेहमूद पठाण – ७९७ मते ( अपक्ष) ६) शकिल चोपदार – १०३२मते (अपक्ष ) ७) किरण चांदगुडे – १९७ मते (अपक्ष) ८) चंद्रहंस औताडे – १८२मते ( अपक्ष) ९) खंडू थोरात – २३२मते ( अपक्ष ) १०) दिलीप गायकवाड – १२८ मते ( अपक्ष) ११) विजय जाधव – २४२ मते (अपक्ष) १२) विश्वनाथ वाघ – १ हजार ४९ मते (अपक्ष) १३) नोटा – १ हजार ६९३ मते मिळाले .
एकुण २ लाख ८९ हजार ६५६ मतदारांपैकी २ लाख ६ हजार ५५४ मतदारांनी मतदान केले. त्यात पोस्टल मतदान १ हजार ५०४ मतदान झाले व ८ मते बाद झाली. झालेल्या एकुण मतदानापैकी आशुतोष काळे यांनी १ लाख ६१ हजार १४७ मते घेतली. त्यात १ लाख २४ हजार ६२४ मतांची आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत काळे यांना केवळ ८२२ मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी कोपरगाव विधानसभेच्या आजपर्यंतच्या निकालातील सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा तसेच राज्यात अव्वल होण्याचा विक्रम काळेंनी केला आहे. शरद पवार यांनी हि निवडणुक प्रतिष्ठेची केली होती दोन पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. आमदार काळे यांच्या पाठीशी अजित पवार यांची ताकत होती.
दरम्यान आमदार काळे यांना विक्रमी मताधिक्य मिळण्यात भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हे परिवाराने युतीचा धर्म पाळण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही. उलट महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना मनापासून सहकार्य केल्याने काळेंच्या विजयाचा नवा विक्रम राज्यात झाला आहे. आमदार काळे यांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत फटाक्यांची आतषबाजी बाजी करुन गुलालाची उधळण केली. आमदार काळे यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे यांनी आशुतोष काळे यांचे अभिनंदन करीत मायेची मिठ्ठी मारुन आशीर्वाद दिला. काळे यांच्या विजयाने कोपरगाव मतदार संघात सर्वञ जल्लोष साजरा केला जात आहे.