उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही काळे गटाचा बोलबाला

कान्हेगाव, मंजुर, कारवाडी, शहाजापूर, दहेगाव बोलका, चांदगव्हाण,लौकी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ :  १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या जोरदार मुसंडी मारून अनेक ग्रामपंचायतीची सत्ता मिळवीलेल्या काळे गटाचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत देखील बोलबाला दिसून आला असून दुसऱ्या टप्यात पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कान्हेगाव, मंजुर, कारवाडी, शहाजापूर, दहेगाव बोलका, चांदगव्हाण, लौकी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मतदार संघातील पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने आपली विजयी परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्यातील उपसरपंचांच्या निवडीमध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून दुसऱ्या टप्प्यात देखील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कान्हेगाव, मंजुर, कारवाडी, शहाजापूर, दहेगाव बोलका, चांदगव्हाण, लौकी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार विराजमान झाले आहे त्यामुळे सरपंचपदाबरोबरच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील काळे गटाचा बोलबाला दिसून आला.

दुसऱ्या टप्प्यातील उपसरपंचपदाच्या निवडणुकीतील काळे गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत कान्हेगाव -दिपक प्रकाश चौधरी, कारवाडी-सचिन वसंतराव क्षिरसागर, मंजुर ग्रामपंचायत- पंडित देवराम गावंड, शहाजापूर- शरद साहेबराव वाबळे, दहेगाव बोलका-गुलाबराव प्रभाकर वल्टे, चांदगव्हाण- दिलीप कारभारी आव्हाड, लौकी- राहुल दिनकर खंडीझोड हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेवून गावचा विकास करू. ज्या विश्वासाने आम्हाला संधी दिली त्या संधीचे सोने करून  येणाऱ्या सर्व निवडणुकीत काळे गटाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी व विधानसभा निवडणुकीत जास्तीत मते आ. आशुतोष काळे यांना विकासाच्या माध्यमातून मिळवून देवू अशी ग्वाही सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांनी दिली आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे उपस्थित सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.