शिबीरातून मिळतात श्रमसंस्कार, नेतृत्वगुण, समाजसेवेचे परिपाठ – डॉ. घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ :  विद्यार्थीदशेत राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या होणाऱ्या शिबीरातून श्रमसंस्कार, नेतृत्त्वगुण व समाजसेवेचे परिपाठ मिळत असतात. भावी जीवनात या परिपाठाचा निश्चीत मोठा फायदा होत असतो. म्हणून अशा शिबीरात जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी सहभागी व्हायला हवे .असे प्रतिपादन माजी सभापती डॉं क्षितीज घुले यांनी केले.

     येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आखतवाडे येथे चालू असलेल्या विशेष दिवाळी शिबीराचा समारोप डॉ घुले यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.

        गेली सात दिवस या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यां विद्यार्थिनीनी गावात साफसफाई ,वृक्ष लागवड केली. पथ नाट्याद्वारे गावात व्यसनमुक्ती, बेटी पढावो, बेटी बचाओ आदि विषयावर उदबोधन केले.

     यावेळी संस्थेच्या विश्वस्त निर्मलाताई काटे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, प्रक्षिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव, डॉ सुधाकर लांडे, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके,सरपंच रघुनाथ उगले,प्राचार्य डॉ पुरुषोत्तम कुंदे, सेवा अधिकारी डॉ. संदिप मिरे, डॉ. उषा शेरखाने, शाहादेव खोसे, कैलास बडे, डॉ. अनिता आढाव, सुनिल साळवे, गणेश साळवे, संजय उगले, पोपट राशिनकर, रविंद्र राशिनकर, गणेश भागवत, संकेत वांढेकर, रोहन साबळे, संदीप गाढे, बापुराव राशिनकर, आकाश वाघमारे, सचिन राशिनकर, संभाजी उगले, ज्ञानेश्वर गोरे आदिंची उपस्थिती होती.