संजीवनीचे विद्यार्थी बनत आहे कुटूंबाचा आधार – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने श्नायडर  इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत संजीवनीच्या तीन विद्यार्थ्यांची वार्षिक  पॅकेज रू ३. ७५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली असुन दरवर्षी प्रमाणे चालु वर्षीही संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार सुरूवात झाली आहे. वयाच्या १९ व्या वर्षीच संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील मुलं कमावते होवुन कुटूंबाचे आधार बनत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की पाॅलीटेक्निकच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात विध्यार्थी जेव्हा शेवटच्या सत्रात असतात, तेव्हा ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विविध नामांकित कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आंमत्रित केल्या जाते. यात कंपनींचे एचआर मॅनेजर्स विध्यार्थ्यांच्या  मुलाखती घेतात. सुरूवातीलाच ऑटोमेशन, इलेक्ट्रिक उपकरणे/यंत्रे, इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  बहुराष्ट्रीय  युरोपियन कंपनी  श्नायडरचा ड्राईव्ह झाला.

यात या कंपनीने अपुर्वा अनिल भोंगळे, राजा कुमार व अभिषेक  कुमार यांची रू ३. ७५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. हे विध्यार्थी त्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षेच्या निकालानंतर लागलीच नोकरीत  रूजु होणार आहे.

               संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये पहिल्या वर्षापासुनच विध्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम शिकवुन त्यांचे  बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विविध पैलुंची रूजवण केल्या जाते. हे विध्यार्थी अंतिम वर्षात आल्यावर त्यांना नोकरी करायची की उच्च शिक्षणासाठी जायचे, हे पर्याय विचारून त्यांच्या पालकांची संमती घेवुन नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विध्यार्थ्यांना  कंपनीनिहाय व शाखेनिहाय विशेष प्रशिक्षण  दिल्या जाते, त्यामुळे विध्यार्थी कंपन्याच्या कसोट्यांना  अगदी सहज सामोरे जावुन आपले नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण करतात.

         निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य प्रा. ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार व प्रा. आर. व्ही. भाकरे उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्षनितिनदादा कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले.